S M L

ट्रम्प फक्त 1 डॉलर पगार घेणार !

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2016 06:47 PM IST

ट्रम्प फक्त 1 डॉलर पगार घेणार !

14 नोव्हेंबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी आपण एक डॉलर एवढाच पगार घेणार, असं जाहीर केलंय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना 4 लाख डॉलर्सचा पगार असतो. पण ट्रम्प मात्र त्यातला एक डॉलरच घेणार आहेत. त्याशिवाय आपण सुट्टीही घेणार नाही, असं ट्रम्प म्हणालेत. डॉनल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारमोहिमेत सप्टेंबर महिन्यातच हे आश्‍वासन दिलं होतं.

सीबीएस या वृत्तवाहिनीने डॉनल्ड ट्रम्प यांची एक तासाची मुलाखत घेतली. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतरची ट्रम्प यांची ही पहिलीच मुलाखत आहे. आम्ही अमेरिकन नागरिकांवरचा कर कमी करणार आहोत. त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणा-या योजनाही राबवू, असं ट्रम्प त्यांनी सांगितलं.

डॉनल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारमोहिमेमध्ये स्थलांतरितांविरुद्ध प्रचार केला होता. त्यानुसार, अमेरिकेतून 30 लाख बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्यात येईल, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या गन लॉबीचं वेळोवेळी समर्थन केलंय. त्यासोबत महिलांच्या गर्भपाताच्या अधिकारालाही त्यांचा विरोध आहे. या मुद्द्यांबद्दल माझं हेच धोरण राहील, असंही ट्रम्प या मुलाखतीत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2016 06:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close