S M L

भारताचा सुपर एटमध्ये दणक्यात प्रवेश

3 मेलागोपाठ दोन विजय...आणि सुपर एटमध्ये दणक्यात प्रवेश... मिशन वर्ल्ड कपमध्ये भारताला यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षाच नव्हती... पण आता टीमसमोर आव्हान असणारेय विजयी कामगिरी कायम राखण्याचं....गेले दोन आठवडे महेंद्रसिंग धोणीसाठी कॅप्टन म्हणून जबरदस्त होते.. आधी चेन्नई सुपर किंग्जचं नेत्तृत्व करत आयपीएलचं विजेतेपद आणि आता वर्ल्ड कप 20-20 स्पर्धेत टीमची चांगली कामगिरी...पण तरीही कॅप्टन धोणी अजूनही समाधानी नाही.प्रतिस्पर्धी काय योजना आखतात यावर विचार करण्यापेक्षा टीम एकत्र येऊन कशी खेळेल याचा मी विचार करतो.टीमसाठी स्पर्धेत पहिलीच सेंच्युरी ठोकणार्‍या सुरेश रैनाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. रैनाने आयपीएलमध्येही धोणी आणि चेन्नईसाठी जबरदस्त कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरूद्धची सेंच्युरी टीमचं मनोबल उंचवण्यासाठीही गरजेची ठरली...आता टीम इंडिया सज्ज होतेय ती सुपर एटसाठी .... आता टीमची रणनिती कशी असेल यावर धोणी आणि टीम व्यवस्थापन विचार करत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाची मदार होती ती स्पीन बॉलिंगवर.... आणि स्पर्धेत पुढे भारतीय स्पीनरकडून अशीच कामगिरी बघायला मिळेल असं काही क्रिकेट समीक्षकांचं मत आहे...टीमच्या विजयाचं श्रेय बॅट्समनला मिळो किंवा बॉलर्सना... टीम इंडियाची ही विजयी कामगिरी पुढे नेण्यासाठी कॅप्टन धोणीच्या समोर मोठं आव्हान असणार आहे, हे नक्की...

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2010 06:05 PM IST

भारताचा सुपर एटमध्ये दणक्यात प्रवेश

3 मे

लागोपाठ दोन विजय...आणि सुपर एटमध्ये दणक्यात प्रवेश... मिशन वर्ल्ड कपमध्ये भारताला यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षाच नव्हती... पण आता टीमसमोर आव्हान असणारेय विजयी कामगिरी कायम राखण्याचं....

गेले दोन आठवडे महेंद्रसिंग धोणीसाठी कॅप्टन म्हणून जबरदस्त होते.. आधी चेन्नई सुपर किंग्जचं नेत्तृत्व करत आयपीएलचं विजेतेपद आणि आता वर्ल्ड कप 20-20 स्पर्धेत टीमची चांगली कामगिरी...पण तरीही कॅप्टन धोणी अजूनही समाधानी नाही.प्रतिस्पर्धी काय योजना आखतात यावर विचार करण्यापेक्षा टीम एकत्र येऊन कशी खेळेल याचा मी विचार करतो.

टीमसाठी स्पर्धेत पहिलीच सेंच्युरी ठोकणार्‍या सुरेश रैनाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. रैनाने आयपीएलमध्येही धोणी आणि चेन्नईसाठी जबरदस्त कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरूद्धची सेंच्युरी टीमचं मनोबल उंचवण्यासाठीही गरजेची ठरली...आता टीम इंडिया सज्ज होतेय ती सुपर एटसाठी ....

आता टीमची रणनिती कशी असेल यावर धोणी आणि टीम व्यवस्थापन विचार करत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाची मदार होती ती स्पीन बॉलिंगवर.... आणि स्पर्धेत पुढे भारतीय स्पीनरकडून अशीच कामगिरी बघायला मिळेल असं काही क्रिकेट समीक्षकांचं मत आहे...

टीमच्या विजयाचं श्रेय बॅट्समनला मिळो किंवा बॉलर्सना... टीम इंडियाची ही विजयी कामगिरी पुढे नेण्यासाठी कॅप्टन धोणीच्या समोर मोठं आव्हान असणार आहे, हे नक्की...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2010 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close