S M L

मुंबई ठप्प, राजकारण तेजीत

4 मेमोटरमनच्या संपामुळे दुसर्‍या दिवशीही मुंबईतील लोकलसेवा ठप्प आहे. त्यामुळे मुंबईतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. अर्ध्या पाऊण तासांच्या अंतराने एखादी लोकल धावताना दिसत आहे. ती पकडण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. अनेक चाकरमान्यांनी आजचा संप लक्षात घेऊन ऑफिसला जाणेच टाळले. जे ऑफिसला निघाले ते रस्त्यातच अडकले. त्यामुळे सरकारी आणि खाजगी ऑफिसेस जवळपास ओस पडली होती. खुद्द मंत्रालयातही केवळ 18 टक्केच कर्मचारी पोहोचू शकले. यामुळे कोर्टाचं कामकाजही बंद पडले. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने साडेचार हजार बेस्ट, एसटी आणि खाजगी बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत. पण त्याही कमी पडत आहेत. संपाचे राजकारण सुरूसंपामुळे मुंबईकरांचे असे हाल सुरू असताना एकीकडे या संपाचे राजकारण सुरू झाले आहे. संपकरी मोटरमनवर इस्मा लावण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण राज्य सरकारने सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. रेल्वे मोटरमन संपाबद्दल मुख्यमंत्राच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त करण्यात येणार आहे. या कमिटीत मुख्य सचिव, गृह सचिव, आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. ही समिती मोटरमनच्या मागण्यांचा आढावा घेऊन उपायोजना सुचवणार आहे.मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेचे आंदोलनदरम्यान संपकर्‍यांनी मुंबईकरांची अडवणूक थांबवावी अन्यथा मनसे या संपकरी मोटरमनच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. याचबरोबर हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. नियोजनाच्या अभावामुळेच असे प्रकार घडत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. मोटरमनच्या मागण्यांना आमची सहानूभूती आहे. पण त्यांच्या आंदोलनाची पद्धत चुकीची आहे, असे मत राज यांनी व्यक्त केले आहे. मोटरमननी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकर कामावर रूजू व्हावे. नाही तर सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.राज ठाकरेंचा इशारा लक्षात घेऊन मनसैनिकांनी लगेचच आंदोलनाला सुरुवाक केली आहे. त्यांनी सीएसटी स्टेशनमध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मोटरमनच्या आंदोलनाबद्दल योग्य माहिती मिळावी, या मागणीसाठी ठाणे स्टेशन मास्तर केबिनच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मोटरमन आर. आर. यांच्याकडेदुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या संपात मध्यस्थीसाठी प्रयत्न करत आहेत. तर मोटरमन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. ज्या मोटरमनला कामावर जायचे आहे, त्यांना संपूर्ण पोलीस सुरक्षा पुरवण्यात येईल, असे आश्वासन आर. आर. पाटील यांनी दिले आहे.रेल्वे संघटनांमध्ये मतभेद या संपावरून रेल्वे संघटनांमधील मतभेद समोर आले आहेत. या संपाला आला पाठींबा नसल्याचे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष आर.पी. भटनागर यांनी जाहीर केले आहे. तर इस्मा लागू शकणार्‍या मोटरमनच्या पाठीशी वेस्टर्न रेल्वे मजदूर संघ उभा राहिला आहे. पण त्यांनी मोटरमन असोसिएशनला आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. आंदोलन मागे घेतल्यास इस्माच्या विरोधात पाठीशी उभे राहू, अशी भूमिका संघाने घेतली आहे. आंदोलक ताब्यात आंदोलन करणार्‍या 170 संपकरी मोटरमनना सीएसटी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व संप करणार्‍या मोटरमन्सवर रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, इतर मोटरमन्सला संपासाठी चिथावणी देणे या आरोपांखाली ताब्यात घेण्यात आले आहे. यातील चार मोटरमन्सविरूध्द गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मोटरमन्सना या आधीच तीन तासांत कामावर परता, असा इशारा राज्यसरकारने दिला आहे. लोकसभेत गोंधळमुंबईतील मोटरमनच्या संपावरून लोकसभेत जोरदार गोंधळ झाला. यावरून सर्वपक्षीय खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे सुरुवातीला कामकाज 1 तासासाठी तहकूब करण्यात आले. पण 12 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर खासदारांनी मोटरमनच्या संपाचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच, सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करावा, असे आवाहन मुंबईच्या खासदारांनी केले. यावरून पुन्हा गदारोळ झाल्यानंतर पुन्हा लोकसभा तहकूब करण्यात आली. आता 6 वाजता रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी या विषयावर निवेदन करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2010 10:40 AM IST

मुंबई ठप्प, राजकारण तेजीत

4 मे

मोटरमनच्या संपामुळे दुसर्‍या दिवशीही मुंबईतील लोकलसेवा ठप्प आहे. त्यामुळे मुंबईतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

अर्ध्या पाऊण तासांच्या अंतराने एखादी लोकल धावताना दिसत आहे. ती पकडण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.

अनेक चाकरमान्यांनी आजचा संप लक्षात घेऊन ऑफिसला जाणेच टाळले. जे ऑफिसला निघाले ते रस्त्यातच अडकले. त्यामुळे सरकारी आणि खाजगी ऑफिसेस जवळपास ओस पडली होती. खुद्द मंत्रालयातही केवळ 18 टक्केच कर्मचारी पोहोचू शकले. यामुळे कोर्टाचं कामकाजही बंद पडले.

संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने साडेचार हजार बेस्ट, एसटी आणि खाजगी बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत. पण त्याही कमी पडत आहेत.

संपाचे राजकारण सुरू

संपामुळे मुंबईकरांचे असे हाल सुरू असताना एकीकडे या संपाचे राजकारण सुरू झाले आहे. संपकरी मोटरमनवर इस्मा लावण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण राज्य सरकारने सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. रेल्वे मोटरमन संपाबद्दल मुख्यमंत्राच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त करण्यात येणार आहे. या कमिटीत मुख्य सचिव, गृह सचिव, आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. ही समिती मोटरमनच्या मागण्यांचा आढावा घेऊन उपायोजना सुचवणार आहे.मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मनसेचे आंदोलन

दरम्यान संपकर्‍यांनी मुंबईकरांची अडवणूक थांबवावी अन्यथा मनसे या संपकरी मोटरमनच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. याचबरोबर हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. नियोजनाच्या अभावामुळेच असे प्रकार घडत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोटरमनच्या मागण्यांना आमची सहानूभूती आहे. पण त्यांच्या आंदोलनाची पद्धत चुकीची आहे, असे मत राज यांनी व्यक्त केले आहे. मोटरमननी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकर कामावर रूजू व्हावे. नाही तर सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरेंचा इशारा लक्षात घेऊन मनसैनिकांनी लगेचच आंदोलनाला सुरुवाक केली आहे. त्यांनी सीएसटी स्टेशनमध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मोटरमनच्या आंदोलनाबद्दल योग्य माहिती मिळावी, या मागणीसाठी ठाणे स्टेशन मास्तर केबिनच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

मोटरमन आर. आर. यांच्याकडे

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या संपात मध्यस्थीसाठी प्रयत्न करत आहेत. तर मोटरमन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. ज्या मोटरमनला कामावर जायचे आहे, त्यांना संपूर्ण पोलीस सुरक्षा पुरवण्यात येईल, असे आश्वासन आर. आर. पाटील यांनी दिले आहे.

रेल्वे संघटनांमध्ये मतभेद

या संपावरून रेल्वे संघटनांमधील मतभेद समोर आले आहेत. या संपाला आला पाठींबा नसल्याचे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष आर.पी. भटनागर यांनी जाहीर केले आहे.

तर इस्मा लागू शकणार्‍या मोटरमनच्या पाठीशी वेस्टर्न रेल्वे मजदूर संघ उभा राहिला आहे. पण त्यांनी मोटरमन असोसिएशनला आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. आंदोलन मागे घेतल्यास इस्माच्या विरोधात पाठीशी उभे राहू, अशी भूमिका संघाने घेतली आहे.

आंदोलक ताब्यात

आंदोलन करणार्‍या 170 संपकरी मोटरमनना सीएसटी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व संप करणार्‍या मोटरमन्सवर रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, इतर मोटरमन्सला संपासाठी चिथावणी देणे या आरोपांखाली ताब्यात घेण्यात आले आहे. यातील चार मोटरमन्सविरूध्द गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मोटरमन्सना या आधीच तीन तासांत कामावर परता, असा इशारा राज्यसरकारने दिला आहे.

लोकसभेत गोंधळ

मुंबईतील मोटरमनच्या संपावरून लोकसभेत जोरदार गोंधळ झाला. यावरून सर्वपक्षीय खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे सुरुवातीला कामकाज 1 तासासाठी तहकूब करण्यात आले. पण 12 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर खासदारांनी मोटरमनच्या संपाचा तीव्र शब्दांत निषेध केला.

तसेच, सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करावा, असे आवाहन मुंबईच्या खासदारांनी केले. यावरून पुन्हा गदारोळ झाल्यानंतर पुन्हा लोकसभा तहकूब करण्यात आली. आता 6 वाजता रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी या विषयावर निवेदन करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2010 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close