S M L

नोटाबंदीचा निर्णय संधिसाधू,राहुल गांधींचा हल्लाबोल

Sachin Salve | Updated On: Nov 15, 2016 09:41 PM IST

नोटाबंदीचा निर्णय संधिसाधू,राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul_gandhi415 नोव्हेंबर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी नोटाबंदीच्या निर्णयावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारचा हा निर्णय संधिसाधू आहे, असा आरोप त्यांनी केला. हा निर्णय घेताना कोणतंही नियोजन नव्हतं. एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता जनतेला कमीत कमी त्रास होईल याची काळजी सरकारनं घ्यायला हवी, असंही राहुल गांधी म्हणाले.

काळा पैसावाल्या मोठ्या चोरांना मोदींनी मोकळं सोडलंय. बँकांच्या लाईनमध्ये फक्त गरीब आणि मध्यमवर्गीय जनता आहे. शहरात लोकांना इतका त्रास सहन करावा लागतोय तर गावातल्या लोकांना किती समस्यांना तोंड द्यावं लागत असेल, असा सवालही राहुल गांधींनी विचारला.

हा निर्णय जाहीर करण्याच्या आधी पश्चिम बंगाल भाजपने त्यांच्याकडचे पैस बँकेत जमा केले होते. त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे, असाही आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2016 09:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close