S M L

कसाबचा निकाल गुरुवारी

4 मेमुंबईवर हल्ला करून शेकडो निरपराध लोकांचे बळी घेणारा दहशतवादी अजमल कसाब यांला आता गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. दहशतवादी हल्ल्यात कसाबला दोषी ठरवल्यानंतर आज स्पेशल कोर्टात युक्तिवाद झाला. कसाबने केलेले कृत्य हे अमानवी आणि दुर्मिळातील दुर्मिळ आहे. त्यामुळे त्याला मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. तर कसाबचे वय लक्षात घ्या. तो सराईत गुन्हेगार नाही. त्याचे ब्रेनवॉश केले गेले आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा न देता जन्मठेप द्यावी, अशी मागणी कसाबच्या वकिलांनी विशेष न्यायाधीश एन. एल. ताहिलानी यांच्याकडे केली. हा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी यावरील सुनावणी गुरुवारी केली जाईल, असे सांगितले. कसाबला फाशी देण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी कोर्टात 8 कारणे दिली आहेत. ती पुढीलप्रमाणे- 1) हा गुन्हा परिस्थितीनुसार झालेला नाही. 2) एखाद्या परिस्थितीमुळे आरोपीकडून गुन्हा घडतो. कसाबबाबत तसे नाही. त्याने माफी मिळवण्याच्या पलीकडचा गुन्हा केला आहे. कसाबने 72 लोकांची हत्या केली असून त्यात 14 पोलीस अधिकारी आहेत. 3) मरणार्‍यांनी कुठलाही प्रतिकार केला नाही . 72 पैकी 52 लोक सीएसटी येथे ठार झाले. 9 कामामध्ये तर दोन विले पार्ले येथे ठार झाले. मृतांमध्ये आठ महिला आणि चार लहान मुलांचा समवेश आहे.4 ) कसाबने लहान मुले, वृद्ध महिला, पुरुष, हिंदु , मुस्लिम, ज्यू ख्रिश्चन आणि शस्त्रहिन लोकांना आणि हत्यारी पोलिसांनाही मारले आहे. 5) कसाबचा सीएसटी येथे मोठ्या संख्येने लोकांना मारण्याचा विचार होता. पण तेथे कमी गर्दी बघून आपल्याला मोठ्या प्रमाणात हत्याकांड करता येणार नाही, हे लक्षात आल्यावर कसाबने नाराजी व्यक्त केली होती. 6) रानटी जनावरे देखिल आपल्या भुकेसाठी एखादी शिकार करत असतात. ते शिकार झाल्यावर शांत होतात. पण कसाब हा हत्या करणारी मशीन आहे. आणि ही मशीन पाकिस्तानात बनली आहे. सीएसटी स्टेशन येथे जखमी लोकांना विव्हळताना पाहून कसाब खूष झाला होता. अशी साक्ष फारुख नावाच्या साक्षीदाराने दिली आहे. कसाबने अमरसिंग सोलंकीला केवळ मजा म्हणून मारले. 7) कसाब हा कसाई आहे. कसाबने मॅजिस्ट्रेटजवळ कबुलीजबाब देताना 'मेरे जैसे और भी फियादीन' तयार व्हावेत यासाठी मी हा कबुलीजबाब देत असल्याचे सांगितल आहे. 8) काही गुन्हे हे रागाच्या भरात होत असतात. पण कसाबबाबत तसे नाही. हे सर्व राक्षसी, सैतानी कृत्याप्रमाणे आहे. त्यामुळे अशा सैतानांना मृत्यूदंड द्यायला हवा. 9) कसाब हा 166 जणांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. त्याला फाशी द्या. कसाब दोषी सिद्ध झाल्याने आता भारत सरकार पाकिस्तानवर दबाव आणणार आहे. 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफीज सईद आणि झकी-उर-रहमान लख्वी यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानकडे करण्यात येणार आहे. तसेच कसाबच्या निकालाची एक प्रत पाकिस्तानला देण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2010 12:42 PM IST

कसाबचा निकाल गुरुवारी

4 मे

मुंबईवर हल्ला करून शेकडो निरपराध लोकांचे बळी घेणारा दहशतवादी अजमल कसाब यांला आता गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. दहशतवादी हल्ल्यात कसाबला दोषी ठरवल्यानंतर आज स्पेशल कोर्टात युक्तिवाद झाला.

कसाबने केलेले कृत्य हे अमानवी आणि दुर्मिळातील दुर्मिळ आहे. त्यामुळे त्याला मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली.

तर कसाबचे वय लक्षात घ्या. तो सराईत गुन्हेगार नाही. त्याचे ब्रेनवॉश केले गेले आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा न देता जन्मठेप द्यावी, अशी मागणी कसाबच्या वकिलांनी विशेष न्यायाधीश एन. एल. ताहिलानी यांच्याकडे केली.

हा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी यावरील सुनावणी गुरुवारी केली जाईल, असे सांगितले.

कसाबला फाशी देण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी कोर्टात 8 कारणे दिली आहेत. ती पुढीलप्रमाणे-

1) हा गुन्हा परिस्थितीनुसार झालेला नाही.

2) एखाद्या परिस्थितीमुळे आरोपीकडून गुन्हा घडतो. कसाबबाबत तसे नाही. त्याने माफी मिळवण्याच्या पलीकडचा गुन्हा केला आहे. कसाबने 72 लोकांची हत्या केली असून त्यात 14 पोलीस अधिकारी आहेत.

3) मरणार्‍यांनी कुठलाही प्रतिकार केला नाही . 72 पैकी 52 लोक सीएसटी येथे ठार झाले. 9 कामामध्ये तर दोन विले पार्ले येथे ठार झाले. मृतांमध्ये आठ महिला आणि चार लहान मुलांचा समवेश आहे.

4 ) कसाबने लहान मुले, वृद्ध महिला, पुरुष, हिंदु , मुस्लिम, ज्यू ख्रिश्चन आणि शस्त्रहिन लोकांना आणि हत्यारी पोलिसांनाही मारले आहे.

5) कसाबचा सीएसटी येथे मोठ्या संख्येने लोकांना मारण्याचा विचार होता. पण तेथे कमी गर्दी बघून आपल्याला मोठ्या प्रमाणात हत्याकांड करता येणार नाही, हे लक्षात आल्यावर कसाबने नाराजी व्यक्त केली होती.

6) रानटी जनावरे देखिल आपल्या भुकेसाठी एखादी शिकार करत असतात. ते शिकार झाल्यावर शांत होतात. पण कसाब हा हत्या करणारी मशीन आहे. आणि ही मशीन पाकिस्तानात बनली आहे. सीएसटी स्टेशन येथे जखमी लोकांना विव्हळताना पाहून कसाब खूष झाला होता. अशी साक्ष फारुख नावाच्या साक्षीदाराने दिली आहे. कसाबने अमरसिंग सोलंकीला केवळ मजा म्हणून मारले.

7) कसाब हा कसाई आहे. कसाबने मॅजिस्ट्रेटजवळ कबुलीजबाब देताना 'मेरे जैसे और भी फियादीन' तयार व्हावेत यासाठी मी हा कबुलीजबाब देत असल्याचे सांगितल आहे.

8) काही गुन्हे हे रागाच्या भरात होत असतात. पण कसाबबाबत तसे नाही. हे सर्व राक्षसी, सैतानी कृत्याप्रमाणे आहे. त्यामुळे अशा सैतानांना मृत्यूदंड द्यायला हवा.

9) कसाब हा 166 जणांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. त्याला फाशी द्या.

कसाब दोषी सिद्ध झाल्याने आता भारत सरकार पाकिस्तानवर दबाव आणणार आहे.

26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफीज सईद आणि झकी-उर-रहमान लख्वी यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानकडे करण्यात येणार आहे.

तसेच कसाबच्या निकालाची एक प्रत पाकिस्तानला देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2010 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close