S M L

रांगेतली माणुसकीही मेली, उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Nov 16, 2016 05:50 PM IST

रांगेतली माणुसकीही मेली, उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू

15 नोव्हेंबर : नांदेडमध्ये बँकेच्या रांगेचा आणखी एक बळी गेलाय. नांदेडच्या बळीरामपूर दिगंबर कसबे या वृद्धाचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. पेन्शनचे पैसे काढण्यासाठी कसबे हे सकाळी साडे आठ वाजता रांगेत उभे होते. रांगेत असतानाच ते कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे कसबे रांगेत खाली कोसळल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यास कोणीही पुढं आलं नाही.

नांदेडमधील बळीरामपुर येथेल सत्तर वर्षीय दिंगबर कसबे हे सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या पेन्शनचे पैसे काढण्यासाठी , तसंच आपल्या जवळील जुन्या मोटा बदलण्यासाठी गेले होते. एसबीआय बँकेच्या तुप्पा येथील शाखेत सकाळपासून मोठी रांग लागली होती. दिंगबर कसबे हे देखिल रांगेत थांबले. तासभर थांबल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि चक्कर येऊन ते खाली कोसळले. काही क्षणातच त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला.विशेष म्हणजे हजोरोंची गर्दी असतांना दिंगबार कसबे यांना रुग्नालयात नेण्यासाठी कोणीही पुढ आलं नाही. वेळीच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2016 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close