S M L

नोटबंदीच्या घोषणेनंतर किती निधी जमला?, आयकर विभागाची 1400 धार्मिक संस्थांना नोटीस

Sachin Salve | Updated On: Nov 16, 2016 10:10 PM IST

नोटबंदीच्या घोषणेनंतर किती निधी जमला?, आयकर विभागाची 1400 धार्मिक संस्थांना नोटीस

16 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटाबंदीमुळे काळापैशावाल्याचे धाबे दणाणले आहे. आता धार्मिक संस्था आयकर खात्याच्या रडारवर आहे. तब्बल 1400 धार्मिक संस्थांना आतापर्यंत किती निधी गोळा झालीये याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहे. तसंच पंतप्रधानांच्या नोटबंदीच्या घोषणेनंतर आणि आधी किती रक्कम झालीये हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहे.

आयकर विभागानं धार्मिक संस्थांवर कडक नजर ठेवायला सुरुवात केलीय. यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबदलीचा निर्णय जाहीर करण्याआधी किती पैसे होते आणि 11 नोव्हेंबरला किती होते हे आम्हाला कळवा अशी सुचना केलीये.

एवढंच नाही तर या काळात जमा झालेला निधी कोणत्या स्वरुपात आला. 500च्या नोटा किती, हजारच्या किती हेही सांगा अशी नोटीसच आयकर विभागानं बजावली. आणि ही नोटीस 5-50 संस्थांना नाही तर तब्बल चौदाशे संस्थांना बजावण्यात आलीय.

या नोटीसला 18 नोव्हेंबरच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.इतकंच नाही तर लोकांकडून 500 आणि हजारच्या नोटा स्वीकारू नका, असे आदेशही आयकर विभागानं दिलेत. 8 नोव्हेंबरला मोदींनी निर्णय जाहीर केल्यावर अनेक लोकांनी धार्मिक स्थळांमध्ये मोठमोठ्या देणग्या दिल्या. त्यामुळे आयकर विभागानं हे पाऊल उचललंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2016 07:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close