S M L

तुमचा होतो खेळ...

4 मेमोटरमनच्या संपाच्या निमित्ताने आज दिवसभर पदड्यावर आणि पडद्याआड मोठे राजकारण झाले.एकमेकांना अडचणीत आणणार्‍या खेळी झाल्या. यात बॅकफूटवर गेली ती शिवसेना. सोमवारी रात्रीच या संपामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते. आज सकाळी तर मुंबईकर हैराण झाले. त्यातच एरव्ही मुंबईची काळजी आम्हीच घेतो, असे दाखवणार्‍या शिवसेनेचा या संपाला पाठींबा होता हे सुद्धा लोकांसमोर आले. आणि यातूनच बाळासाहेबांनी स्वत: पत्रक काढून संपाचा पाठींबा काढून घेतला. दुसरीकडे सरकारी पातळीवर आम्हीही काही तरी करत आहोत, असे सरकार दाखवत राहिले. मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलले. एस्मा लावला गेला. राज ठाकरे या गदारोळात मागे राहिले नाहीत. त्यांनी नेहमीसारखाच इशारा दिला. आणि अखेर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मध्यस्थी करून हा संप मिटवला. पण यानिमित्ताने 'तुमचा होतो खेळ आणि आमचा जातो जीव', अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य मुंबईकरांची होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2010 03:01 PM IST

तुमचा होतो खेळ...

4 मे

मोटरमनच्या संपाच्या निमित्ताने आज दिवसभर पदड्यावर आणि पडद्याआड मोठे राजकारण झाले.एकमेकांना अडचणीत आणणार्‍या खेळी झाल्या. यात बॅकफूटवर गेली ती शिवसेना.

सोमवारी रात्रीच या संपामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते. आज सकाळी तर मुंबईकर हैराण झाले. त्यातच एरव्ही मुंबईची काळजी आम्हीच घेतो, असे दाखवणार्‍या शिवसेनेचा या संपाला पाठींबा होता हे सुद्धा लोकांसमोर आले. आणि यातूनच बाळासाहेबांनी स्वत: पत्रक काढून संपाचा पाठींबा काढून घेतला.

दुसरीकडे सरकारी पातळीवर आम्हीही काही तरी करत आहोत, असे सरकार दाखवत राहिले. मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलले. एस्मा लावला गेला. राज ठाकरे या गदारोळात मागे राहिले नाहीत. त्यांनी नेहमीसारखाच इशारा दिला. आणि अखेर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मध्यस्थी करून हा संप मिटवला.

पण यानिमित्ताने 'तुमचा होतो खेळ आणि आमचा जातो जीव', अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य मुंबईकरांची होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2010 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close