S M L

चंद्रकांत पाटलांना मानाचे पान, मंत्रिमंडळात दुसरे स्थान !

Sachin Salve | Updated On: Nov 17, 2016 11:57 PM IST

चंद्रकांत पाटलांना मानाचे पान, मंत्रिमंडळात दुसरे स्थान !

17 नोव्हेंबर : महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आता राज्याच्या मंत्रिमंडळातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते असणार आहेत. राज्य सरकारनं तसं परिपत्रक जारी केलंय.

राज्याच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे नेते कोण याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होते. मंत्रिमंडळातले अनेक मंत्री दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्रिपदावर दावे करत होते. अखेर चंद्रकांत पाटील यांचं दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून जाहीर झालंय. याअगोदर मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील यांचं राजशिष्टाचारानुसार नवव्या क्रमांकावर होते. आता राजशिष्टाचारात त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून मान मिळालाय. विशेष म्हणजे महसूल खाते हे आधी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे होते. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर त्यांना बहुमान मिळणे हे साहजिकच होते. पण, वेगवेगळ्या आरोपांमुळे मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यामुळे त्यांची ही संधीही हुकलीये.

चंद्रकांत पाटील दोन क्रमांकाचे मंत्री जाहीर झाल्यानं काय होणार आहे ?

- मंत्रिमंडळात दुसरं स्थान मिळाल्यानं विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या शेजारील आसनावर बसण्यास मिळणार

- मुख्यमंत्री परदेश दौ•यावर गेल्यास किंवा त्यांच्या गैरहजेरीत राज्याची सूत्रं चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाणार

- मंत्रिमंडळातील दुस•या क्रमांकाचा नेता कोण या शर्यतीत चंद्रकांत पाटलांनी बाजी मारलीये, त्यांचं राजकीय वजन आणखी वाढलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2016 08:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close