S M L

वाळू ठेकेदार खून प्रकरणी चौघांना अटक

5 मेपुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वाळूमाफीयांनी शरद चौधरी या वाळू ठेकेदाराचा तलवारीचे वार करून खून केला होता. या प्रकरणातील चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. विकास रसाळ, पिंट्या रसाळ, नंदू खेडकर आणि भुजंग बाकरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पुणे जिल्ह्यात कुकडी, घोडनदी, भीमा नदी परिसरात वाळूमाफीयांची दहशत पसरली आहे. विशेषत: दौंड, शिरूर तालुक्यात वाळू माफीयांच्या कारवाया सुरू आहेत. याला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आता नदीकाठी सामूहिक गस्त घालण्याचा मार्ग अवलंबणार आहेत. यात होड्या भाड्याने घेऊन पोलीस, आरटीओ आणि महसूल विभागाचे कर्मचारी मिळून गस्त घालणार आहेत. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक प्रताप दिघावकर यांनी ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2010 09:38 AM IST

वाळू ठेकेदार खून प्रकरणी चौघांना अटक

5 मे

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वाळूमाफीयांनी शरद चौधरी या वाळू ठेकेदाराचा तलवारीचे वार करून खून केला होता. या प्रकरणातील चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

विकास रसाळ, पिंट्या रसाळ, नंदू खेडकर आणि भुजंग बाकरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे जिल्ह्यात कुकडी, घोडनदी, भीमा नदी परिसरात वाळूमाफीयांची दहशत पसरली आहे. विशेषत: दौंड, शिरूर तालुक्यात वाळू माफीयांच्या कारवाया सुरू आहेत.

याला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आता नदीकाठी सामूहिक गस्त घालण्याचा मार्ग अवलंबणार आहेत.

यात होड्या भाड्याने घेऊन पोलीस, आरटीओ आणि महसूल विभागाचे कर्मचारी मिळून गस्त घालणार आहेत. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक प्रताप दिघावकर यांनी ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2010 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close