S M L

भारतीय वंशाच्या निकी हेली होणार अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री ?

Sachin Salve | Updated On: Nov 18, 2016 05:57 PM IST

भारतीय वंशाच्या निकी हेली होणार अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री ?

 18 नोव्हेंबर : अमेरिकेच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री म्हणून हिलरींची कारकीर्द चांगलीच गाजली. आता त्यांच्यानंतर अमेरिकेला दुस-यांदा महिला परराष्ट्रमंत्री मिळण्याची शक्यता आहे आणि त्याही भारतीय वंशाच्या. त्यांचं नाव आहे निकी हेली.

निकी हेली या आज डॉनल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. आपल्या सरकारमध्ये नियुक्ती करण्यासाठी ट्रम्प सध्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना भेटतायत. यामध्ये निकी हेली यांना संधी मिळू शकते.

निकी हेली यांचा जन्म अमेरिकेतला पण त्यांचे आईवडील अमृतसरचे. निकी हेली यांचं मूळ नाव आहे निम्रत रंधवा. त्यांचा जन्म 20 जानेवारी 1972 चा. राज कौर रंधवा आणि अजित सिंग रंधवा हे त्यांचे आईवडील.  हेली यांनी आधी केमिकल कंपनीमध्ये काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी आईच्या फॅशन व्यवसायामध्ये सहभाग घेतला. हेली यांनी 2004मध्ये रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. त्या 2 वेळा नॉर्थ कॅरोलिना राज्याच्या गव्हर्नर राहिल्या आहेत. पती आणि 2 मुलं असा त्यांचा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2016 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close