S M L

नागपूरमध्ये बँक कर्मचाऱ्याचा ऑन ड्युटी हार्टअॅटॅकने मृत्यू

Sachin Salve | Updated On: Nov 18, 2016 09:16 PM IST

नागपूरमध्ये बँक कर्मचाऱ्याचा ऑन ड्युटी हार्टअॅटॅकने मृत्यू

18 नोव्हेंबर : नागपुरात स्टेट बँकेच्या कर्मचा-याचा हार्ट ऍटॅकने मृत्यू झालाय. नागपुरातल्या गांधीनगर भागातल्या स्टेट बँकेच्या शाखेत ही घटना घडलीये. रामपंतुला व्यंकटेश राजेश असं या मृत कर्मचा-याचं नाव आहे.

ग्राहक सहाय्यक म्हणून राजेश काम करीत होते. आज बँकेच्या शाखेत काम करत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यातच त्यांचा मृत्यू झालाय. पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद केल्यानं गेल्या दहा दिवसांपासून कर्मचा-यांवर कामाचा ताण आहे. या ताणातूनच राजेश यांचा मृत्यू झाल्याचा दावा बँकेतल्या त्यांच्या सहका-यांनी केलाय. गुरुवारीही चाकणमध्ये बँक शिपाई तुकाराम तनपुरे यांचा हॉर्ट ऍटकने मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2016 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close