S M L

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी मतदानाला सुरुवात

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2016 01:46 PM IST

vidhan bhavan319 नोव्हेंबर : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. पुणे, सांगली-सातारा, गोंदिया-भंडारा, नांदेड, यवतमाळ, जळगाव या मतदार संघातील विधान परिषदेसाठी हे मतदान होतेय.

पुण्यासह सर्व ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहे. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात असून मतमोजणी 22 तारखेला होणार आहे. सध्या 4 मतदारसंघात राष्ट्रवादी तर प्रत्येकी 1 मतदारसंघांत काँग्रेस आणि भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी संघर्षाचा फायदा शिवसेना, भाजपला होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2016 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close