S M L

घरात दोन उंदीर झाले तर अख्ख घर जाळलं,राज ठाकरेंचा मोदींना टोला

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2016 02:22 PM IST

घरात दोन उंदीर झाले तर अख्ख घर जाळलं,राज ठाकरेंचा मोदींना टोला

 

19 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटाबंदीचा निर्णय घेतला खरा पण जर तो फसला तर देश खड्‌ड्यात जाईल अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसंच घरात दोन उंदीर झाले तर अख्ख घर जाळलं असा टोलाही राज यांनी लगावला.

मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी नोटाबंदीवर भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. मोदींनी मोठ्या हिंमतीने नोटाबंदीचा निर्णय घेतला. जर काही चांगलं होत असेल तर त्याचं स्वागतच आहे. पण, त्यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतोय. मोदी सरकारला काळापैसा कुणाकडे आहे हे माहिती नाही का?, असं असताना काळापैशावाल्यांवर धाडी का टाकल्या नाहीत ? जर काळा पैसे असणा•यांकडे धाडी घातल्या असत्या तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. पण असं झालं नाही उलट कुणालाही माहितीनं देता मोदींनी एकाकी घोषणा करून टाकली. मोदींनी घेतलेला निर्णय फसला तर देश खड्‌ड्यात जाईल अशी टीका राज ठाकरेंनी केली.

दोन हजाराच्या नोटीमुळे काळा पैसा थांबणार कसा ?

500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि 2000 हजारांच्या नोटा बाजारात आणल्यात. बरं 500 चीही नोट आणली आता म्हणे 1000 हजाराचीही नोट बाजारात आणणार आहे. मग एवढं सगळं असतांना 2000 हजाराची नोट आणण्याचा हेतू काय होता ?. 500 आणि 1000 च्या नोटांनी काळापैसा साठला तर 2000 च्या नोटेमुळे काळापैसा कसा थांबणार ? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला. उलट तयारी नसलेला निर्णय घेईन सर्वसामान्यांना वेठीस धरलंय. दहा महिन्यांपासून तयारी सरू आहे तर नोटांची टेंडर दहा दिवसांपूर्वी का काढली ? असा सवालही राज यांनी उपस्थिती केला.

पवारांचं बरं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सकाळी गोव्यात भाषण देताना हुंदका येतो आणि संध्याकाळी शरद पवारांचं कौतुक करता. म्हणे शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलोय. तसं बोट धरुन अजित पवारही आले आहे असा खोचक टोलाही राज ठाकरेंनी लगावला. तसंच नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल कोणत्याच मंत्र्यांना माहिती नाही,ही लोकशाही की हुकुमशाही असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थिती केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2016 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close