S M L

महापौरपदासाठी सागर नाईक निश्चित

5 मेनवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आज नवी मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरले गेले. एक हाती सत्तेमुळे महापौर राष्ट्रवादीचाच असणार हे तर नक्की आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाईक कुंटुंबातीलच महापौर होणार हेही नक्की आहे. यावेळी गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित झाल्याचे समजते. तर उपमहापौरपदी गणेश नाईक यांचे निष्ठावंत भरत नखाते यांची वर्णी लागणार आहे. तसेच महापालिकेच्या खजिन्याची चावी म्हणजेच स्थायी समितीच्या सभापतीपदी रमेश शिंदे आणि अनंत सुतार यांची नावे चर्चेत आहे. तर सभागृह नेतेपदी विठ्ठल मोरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2010 02:21 PM IST

महापौरपदासाठी सागर नाईक निश्चित

5 मे

नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आज नवी मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरले गेले.

एक हाती सत्तेमुळे महापौर राष्ट्रवादीचाच असणार हे तर नक्की आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाईक कुंटुंबातीलच महापौर होणार हेही नक्की आहे. यावेळी गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित झाल्याचे समजते.

तर उपमहापौरपदी गणेश नाईक यांचे निष्ठावंत भरत नखाते यांची वर्णी लागणार आहे.

तसेच महापालिकेच्या खजिन्याची चावी म्हणजेच स्थायी समितीच्या सभापतीपदी रमेश शिंदे आणि अनंत सुतार यांची नावे चर्चेत आहे. तर सभागृह नेतेपदी विठ्ठल मोरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2010 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close