S M L

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची बरोबरी, राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलं

Samruddha Bhambure | Updated On: Nov 22, 2016 04:29 PM IST

 विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची बरोबरी, राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलं

22 नोव्हेंबर: विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. विधान परिषदेच्या 6 जागांपैकी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आणि भाजपलाही 2 जागा मिळाल्या.  एक जागा राष्ट्रवादीला मिळाली तर एक जागा शिवसेनेला मिळाली.

पुणे -  पुणे मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे अनिल भोसले विजयी झालेत.

सातारा-सांगली  - या मतदारसंघात काँग्रेसचे मोहनराव कदम यांनी बाजी मारली.

राष्ट्रवादीला इथे पराभवाचा धक्का बसला.

नांदेड - काँग्रेसचे उमेदवार अमर राजुरकर यांनी 251 मतांनी विजय मिळवलाय.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा कायम ठेवलीय.

यवतमाळ -  शिवसेनेचे तानाजी सावंत यवतमाळ मतदारसंघात विजयी झालेत.

इथे राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.

 भंडारा-गोंदिया -  भाजपचे परिणय फुके विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना हा मोठा धक्का आहे.

 जळगाव -   भाजपचे चंदूलाल पटेल विजयी झालेत.

पुणे विधान परिषद : अनिल भोसले - राष्ट्रवादी - 396 मतांनी विजयी

अनिल भोसले - राष्ट्रवादी - 440 मतं

संजय जगताप - काँग्रेस - 71 मतं

अशोक येनपुरे - भाजप - 133 मतं

विलास लांडे - काँग्रेस बंडखोर - 2 मतं

यवतमाळ विधान परिषद : तानाजी सावंत - युती - 270 मतांनी विजयी

नाजी सावंत - युती - 348 मतं

शंकर बढे - काँग्रेस - 78 मतं

संदीप बाजोरीया - अपक्ष - 2 मतं

5 मतं बाद

सांगली-सातारा विधान परिषद : मोहनराव कदम - काँग्रेस- 64 मतांनी विजयी

मोहनराव कदम - काँग्रेस - 309 मतं

शेखर गोरे - राष्ट्रवादी - 246 मतं

शेखर माने - अपक्ष - 2 मतं

मोहनराव गु. कदम - अपक्ष - 1 मत

10 मतं बाद

नांदेड विधान परिषद : अमर राजुरकर- काँग्रेस- 43 मतांनी विजयी

अमर राजुरकर - काँग्रेस - 251 मतं

श्याम सुंदर शिंदे - अपक्ष - 208 मतं

बाद 12 मतं

गोंदिया-भंडारा विधान परिषद : परिणय फुके - भाजप- 82 मतांनी विजयी

परिणय फुके - भाजप - 219 मतं

राजेंद्र जैन - राष्ट्रवादी - 137 मतं

प्रफुल्ल अग्रवाल - काँग्रेस - 112 मतं

जळगाव विधान परिषद : चंदूलाल पटेल - भाजप- 331 मतांनी विजयी

चंदूलाल पटेल - भाजप - 421 मतं

विजय भास्कर पाटील - अपक्ष- 90 मतं

शेख अखलाक - अपक्ष - 1 मत

नोटा - 1

बाद - 34 मत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2016 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close