S M L

क्रीडामंत्र्यांचे नरमाईचे धोरण

5 मेक्रीडा मंत्री एम. एस. गिल आणि सुरेश कलमाडी यांच्यातील वादात आता क्रीडामंत्र्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. सरकारी हस्तक्षेपाच्या मुद्दयावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी बोलण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्यासाठी एक लवाद नेमण्याची घोषणा आज केंद्रसरकारने केली. दुसरीकडे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने कार्यकारिणीची विशेष बैठक बोलावली आहे. आणि त्यात अध्यक्षपदाच्या मुदतीच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे काही पदाधिकारी आणि नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन यांनी आज सकाळी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची भेट घेतली. फेडरेशनच्या स्वायत्ततेबद्दल ठोस निर्णय घेण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. पण या सगळ्या गोष्टींचा कॉमनवेल्थ स्पर्धेवर काहीही परिणाम होणार नाही, असे कलमाडी यांनी स्पष्ट केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2010 05:44 PM IST

क्रीडामंत्र्यांचे नरमाईचे धोरण

5 मे

क्रीडा मंत्री एम. एस. गिल आणि सुरेश कलमाडी यांच्यातील वादात आता क्रीडामंत्र्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.

सरकारी हस्तक्षेपाच्या मुद्दयावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी बोलण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्यासाठी एक लवाद नेमण्याची घोषणा आज केंद्रसरकारने केली.

दुसरीकडे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने कार्यकारिणीची विशेष बैठक बोलावली आहे. आणि त्यात अध्यक्षपदाच्या मुदतीच्या मुद्यावर चर्चा होणार आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे काही पदाधिकारी आणि नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन यांनी आज सकाळी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची भेट घेतली. फेडरेशनच्या स्वायत्ततेबद्दल ठोस निर्णय घेण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे.

पण या सगळ्या गोष्टींचा कॉमनवेल्थ स्पर्धेवर काहीही परिणाम होणार नाही, असे कलमाडी यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2010 05:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close