S M L

सर्वात वेगवान खटला

6 मेमुंबईवर हल्ला झाला 26 नोव्हेंबर 2008 रोजी. आणि खटल्याचा निकाल लागला आज म्हणजेच 6 मे 2010 रोजी. 18 महिन्यांमध्ये हा खटला निकालात निघाला. आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यांच्या खटल्यांमध्ये हा सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांचा खटला सुमारे 14 वर्षं चालला. 11 जुलै 2006 च्या रेल्वे बॉम्बस्फोटांचा खटला अजून सुरूच झालेला नाही.या खटल्यामुळे फक्त कसाब दोषी आहे एवढेच सिद्ध झाले नाही, तर दहशतवादी हल्ल्याच्या कटात पाकिस्तानचा हात आहे, याचाही पर्दाफाश झाला. कसाबला तर शिक्षा झालीच पण या हल्ल्याचे सूत्रधार हाफीज सईद आणि झकी उर रहमान लख्वी भारताच्या ताब्यात कधी येणार, हा सवालही उपस्थित झाला. पाकिस्तान यापुढे काय भूमिका घेणार, याकडे आता सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे.कसाबचा हा खटला कव्हर करण्यासाठी कोर्टाबाहेर मीडियाने एकच गर्दी केली होती. हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 25 परदेशी नागरिकांचाही समावेश होता. त्यामुळे या गर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय मीडियाचाही समावेश होता.कसाबला कोणत्या गुन्ह्यांखाली फाशीची शिक्षा झाली आहे, ते पाहूया...1) सात व्यक्तींची कट रचून हत्या केल्याबद्दल फाशी 2) भारताविरोधात युद्ध पुकारल्याबद्दल फाशी आणि 10 हजारांचा दंड 3) बंदी असलेल्या 'लष्कर-ए-तोयबा'सारख्या संघटनेचा सदस्य असणे आणि दहशतवादी कृत्य केल्याबद्दल फाशी4) अमर सिंग सोलंकी, अंबादास पवार, तुकाराम ओंबळे, विनोद गुप्ता, अशोक कामटे यांची हत्या केल्याबद्दल फाशी

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2010 10:59 AM IST

सर्वात वेगवान खटला

6 मे

मुंबईवर हल्ला झाला 26 नोव्हेंबर 2008 रोजी. आणि खटल्याचा निकाल लागला आज म्हणजेच 6 मे 2010 रोजी.

18 महिन्यांमध्ये हा खटला निकालात निघाला.

आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यांच्या खटल्यांमध्ये हा सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांचा खटला सुमारे 14 वर्षं चालला. 11 जुलै 2006 च्या रेल्वे बॉम्बस्फोटांचा खटला अजून सुरूच झालेला नाही.

या खटल्यामुळे फक्त कसाब दोषी आहे एवढेच सिद्ध झाले नाही, तर दहशतवादी हल्ल्याच्या कटात पाकिस्तानचा हात आहे, याचाही पर्दाफाश झाला. कसाबला तर शिक्षा झालीच पण या हल्ल्याचे सूत्रधार हाफीज सईद आणि झकी उर रहमान लख्वी भारताच्या ताब्यात कधी येणार, हा सवालही उपस्थित झाला. पाकिस्तान यापुढे काय भूमिका घेणार, याकडे आता सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे.

कसाबचा हा खटला कव्हर करण्यासाठी कोर्टाबाहेर मीडियाने एकच गर्दी केली होती. हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 25 परदेशी नागरिकांचाही समावेश होता. त्यामुळे या गर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय मीडियाचाही समावेश होता.

कसाबला कोणत्या गुन्ह्यांखाली फाशीची शिक्षा झाली आहे, ते पाहूया...

1) सात व्यक्तींची कट रचून हत्या केल्याबद्दल फाशी

2) भारताविरोधात युद्ध पुकारल्याबद्दल फाशी आणि 10 हजारांचा दंड

3) बंदी असलेल्या 'लष्कर-ए-तोयबा'सारख्या संघटनेचा सदस्य असणे आणि दहशतवादी कृत्य केल्याबद्दल फाशी

4) अमर सिंग सोलंकी, अंबादास पवार, तुकाराम ओंबळे, विनोद गुप्ता, अशोक कामटे यांची हत्या केल्याबद्दल फाशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close