S M L

पापाचा घडा भरला...

6 मे26 नोव्हेंबर 2008...मुंबईच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबई शहरावर नव्हे तर मानवतेवर हल्ला चढवला. 166 निरपराधांचा या 10 क्रूरकर्म्यांनी हकनाक बळी घेतला. आणि अखेर आज या पापाचा घडा भरला...पोलिसांच्या हाती सापडलेला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला आज फाशीची शिक्षा झाली. एक नजर टाकूयात या घटनाक्रमावर...2008नोव्हेंबर 26 : कसाबने त्याच्या 9 साथीदारांसह मुंबईवर फिदायीन हल्ला केला. नोव्हे 27 : रात्री 1.30 वाजता कसाबला अटक करण्यात आली. आणि नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नोव्हेंबर 29 : कसाबने पोलिसांना जबाब दिला आणि हल्ला केल्याचे मान्य केले. नोव्हेंबर 29 : हल्ला करण्यात आलेल्या सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात. धुमश्चक्रीत 9 दहशतवादी ठार नोव्हेंबर 30 : कसाबने पोलिसांसमोर गुन्हेगार असल्याचे मान्य केले. डिसेंबर 27 आणि 28 : कसाबची ओळखपरेड झाली 2009जानेवारी 13 : एम. एल. टेहलियानी यांची 26 /11 च्या खटल्यासाठी न्यायाधीश म्हणून नियुक्ती जानेवारी 16 : कसाबच्या खटल्यासाठी आर्थर रोड जेल निश्चित फेब्रुवारी 5 : कसाबची डिएनए टेस्ट झाल्यानंतर कुबेर या बोटीवरील वस्तूंशी त्याचा संबंध असल्याचे स्पष्टफेब्रुवारी 20/21 : कसाबचा मॅजिस्ट्रेटसमोर जबाब फेब्रुवारी 22 : उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीफेब्रुवारी 25 : कसाबविरुद्ध चार्जशीट दाखलएप्रिल 1 : अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्तीएप्रिल 15 : अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबचे वकीलपत्र काढले एप्रिल 16 : अब्बास काझमी यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्तीएप्रिल 17 : कसाबच्या कबुलीजबाबाला सुरुवातएप्रिल 20 : कसाबचा कबुली जबाब कोर्टात सादर. पण कसाबचे घुमजाव एप्रिल 29 : कसाब सज्ञान असल्याचे तज्ज्ञांचे मतमे 3 : स्पेशल कोर्टाने कसाब दोषी असल्याचा निर्णय दिला मे 6 : वेगवेगळ्या 4 गुन्ह्यांसाठी कसाबला फाशी आणि 6 गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2010 11:14 AM IST

पापाचा घडा भरला...

6 मे

26 नोव्हेंबर 2008...मुंबईच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबई शहरावर नव्हे तर मानवतेवर हल्ला चढवला.

166 निरपराधांचा या 10 क्रूरकर्म्यांनी हकनाक बळी घेतला. आणि अखेर आज या पापाचा घडा भरला...पोलिसांच्या हाती सापडलेला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला आज फाशीची शिक्षा झाली.

एक नजर टाकूयात या घटनाक्रमावर...

2008

नोव्हेंबर 26 : कसाबने त्याच्या 9 साथीदारांसह मुंबईवर फिदायीन हल्ला केला.

नोव्हे 27 : रात्री 1.30 वाजता कसाबला अटक करण्यात आली. आणि नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

नोव्हेंबर 29 : कसाबने पोलिसांना जबाब दिला आणि हल्ला केल्याचे मान्य केले.

नोव्हेंबर 29 : हल्ला करण्यात आलेल्या सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात. धुमश्चक्रीत 9 दहशतवादी ठार

नोव्हेंबर 30 : कसाबने पोलिसांसमोर गुन्हेगार असल्याचे मान्य केले.

डिसेंबर 27 आणि 28 : कसाबची ओळखपरेड झाली

2009

जानेवारी 13 : एम. एल. टेहलियानी यांची 26 /11 च्या खटल्यासाठी न्यायाधीश म्हणून नियुक्ती

जानेवारी 16 : कसाबच्या खटल्यासाठी आर्थर रोड जेल निश्चित

फेब्रुवारी 5 : कसाबची डिएनए टेस्ट झाल्यानंतर कुबेर या बोटीवरील वस्तूंशी त्याचा संबंध असल्याचे स्पष्ट

फेब्रुवारी 20/21 : कसाबचा मॅजिस्ट्रेटसमोर जबाब

फेब्रुवारी 22 : उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

फेब्रुवारी 25 : कसाबविरुद्ध चार्जशीट दाखल

एप्रिल 1 : अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती

एप्रिल 15 : अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबचे वकीलपत्र काढले

एप्रिल 16 : अब्बास काझमी यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती

एप्रिल 17 : कसाबच्या कबुलीजबाबाला सुरुवात

एप्रिल 20 : कसाबचा कबुली जबाब कोर्टात सादर. पण कसाबचे घुमजाव

एप्रिल 29 : कसाब सज्ञान असल्याचे तज्ज्ञांचे मत

मे 3 : स्पेशल कोर्टाने कसाब दोषी असल्याचा निर्णय दिला

मे 6 : वेगवेगळ्या 4 गुन्ह्यांसाठी कसाबला फाशी आणि 6 गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2010 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close