S M L

झारखंडमध्ये भाजपचा मुख्यमंत्री

8 मेअखेर झारखंडमधील राजकीय गोंधळ संपला आहे. झारखंडमध्ये भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संयुक्त सरकार स्थापन होणार आहे. आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. झामुमोचे हेमंत सोरेन यांनी भाजपचे पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांची आज भेट घेतली. यावेळी हा निर्णय झाला. केवळ राष्ट्रपती राजवट रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री पदासाठी अर्जुन मुंडा यांचे नाव भाजपमधून पुढे केले जात आहे. कारण आदिवासी समाजाला मुख्यमंत्रीपद जावे, असा भाजपचा प्रयत्न आहे.तत्पूर्वी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा प्रस्ताव हेमंत सोरेन यांनी ठेवला होता. पण भाजपने हा प्रस्ताव फेटाळला.कपात सूचनेच्या मुद्द्यावर शिबू सोरेन यांनी संसदेत यूपीए सरकारच्या बाजूने मतदान केले होते. त्यानंतर भाजपने झारखंडमधील सोरेन सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. त्यानंतर या राजकीय गोंधळास सुरुवात झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2010 08:53 AM IST

झारखंडमध्ये भाजपचा मुख्यमंत्री

8 मे

अखेर झारखंडमधील राजकीय गोंधळ संपला आहे. झारखंडमध्ये भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संयुक्त सरकार स्थापन होणार आहे. आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे.

झामुमोचे हेमंत सोरेन यांनी भाजपचे पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांची आज भेट घेतली. यावेळी हा निर्णय झाला. केवळ राष्ट्रपती राजवट रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री पदासाठी अर्जुन मुंडा यांचे नाव भाजपमधून पुढे केले जात आहे. कारण आदिवासी समाजाला मुख्यमंत्रीपद जावे, असा भाजपचा प्रयत्न आहे.

तत्पूर्वी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा प्रस्ताव हेमंत सोरेन यांनी ठेवला होता. पण भाजपने हा प्रस्ताव फेटाळला.

कपात सूचनेच्या मुद्द्यावर शिबू सोरेन यांनी संसदेत यूपीए सरकारच्या बाजूने मतदान केले होते.

त्यानंतर भाजपने झारखंडमधील सोरेन सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. त्यानंतर या राजकीय गोंधळास सुरुवात झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2010 08:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close