S M L

मुंबईसाठी 72 नव्या लोकल

8 मे मुंबईसाठी 72 नव्या लोकल गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच मध्य आणि पश्चिम मार्गांवर काही जादा लाईन्स टाकण्यात येणार आहेत. एमयुटीपीच्या प्रकल्पांना 1910 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जागतिक बँकेने मंजूर केले आहे. त्यामधून मुंबईसाठी प्रत्येकी 12 डब्यांच्या 72 गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच जादा लोकल गाड्यांसाठी मोटरमन्सची भरती करण्यात येणार आहे. यासोबतच मध्य रेल्वेवर चार, तर पश्चिम रेल्वेवर दोन जादा लाईन्स टाकण्यात येणार आहेत. म्हणजेच सीएसटी ते कुर्ला, मुंबई सेंट्रल ते बोरिवली आणि ठाणे ते दिवा या मार्गांवर प्रत्येकी दोन लाईन्स टाकल्या जाणार आहे. अलिकडेच जागतिक बँक आणि राज्य सरकारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2010 11:04 AM IST

मुंबईसाठी 72 नव्या लोकल

8 मे

मुंबईसाठी 72 नव्या लोकल गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच मध्य आणि पश्चिम मार्गांवर काही जादा लाईन्स टाकण्यात येणार आहेत.

एमयुटीपीच्या प्रकल्पांना 1910 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जागतिक बँकेने मंजूर केले आहे. त्यामधून मुंबईसाठी प्रत्येकी 12 डब्यांच्या 72 गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.

तसेच जादा लोकल गाड्यांसाठी मोटरमन्सची भरती करण्यात येणार आहे. यासोबतच मध्य रेल्वेवर चार, तर पश्चिम रेल्वेवर दोन जादा लाईन्स टाकण्यात येणार आहेत.

म्हणजेच सीएसटी ते कुर्ला, मुंबई सेंट्रल ते बोरिवली आणि ठाणे ते दिवा या मार्गांवर प्रत्येकी दोन लाईन्स टाकल्या जाणार आहे. अलिकडेच जागतिक बँक आणि राज्य सरकारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2010 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close