S M L

अकोल्यात जुन्या नोटा जळालेल्या स्थिती आढळल्या

Sachin Salve | Updated On: Nov 26, 2016 08:53 PM IST

अकोल्यात जुन्या नोटा जळालेल्या स्थिती आढळल्या

 

26 नोव्हेंबर : अकोला शहरातील गोरक्षण भागातील विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत 1000 आणि 500 चा नोटा जाळलेल्या स्थितीत आढळल्याने मोठी खळबळ उडालीय. दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

शहरातील गोरक्षण रोड भागात ही विजय हाऊसिंग सोसायटी आहे. आज दुपारी या सोसायटीच्या गल्लीत कचरा वेचणा-या महिलांना काहीतरी जळत असल्याचं दिसलं. जवळ गेल्यावर त्या 1000 आणि 500 रूपयांच्या जुन्या नोटा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. विशेष म्हणजे या गल्लीत तीन ठिकाणी नोटांना आग लावून त्या जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेची माहिती कचरा वेचणा-या महिलेने लगेच विजय हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशी राजू केडीया यांना दिलीय. केडीया यांनी या प्रकाराची माहिती लगेच खदान पोलीस स्टेशनला दिली.

गोरक्षण रोड भागात या प्रकाराची माहिती वा-यासारखी पसरलीय. अन घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झालीय. तोपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र, त्याआधी येथील अनेक नोटा लोकांनी लांबविल्याची माहिती काही प्रत्यक्षदशछनी दिलीये. दरम्यान, पोलिसांनी या जळालेल्या आणि काही अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेल्या नोटा जप्त केल्या आहे. नोटा जाळणा-या शोध पोलिसांनी सुरू केलाय. तीन ठिकाणी जाळण्यात आलेल्या या नोटांचा नेमका आकडा कळू शकला नाहीय. मात्र, ही रक्कम वीस लाखांवर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2016 08:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close