S M L

महेश भट्टनी केलं 'डिअर जिंदगी'चं कौतुक

Samruddha Bhambure | Updated On: Nov 27, 2016 10:22 AM IST

महेश भट्टनी केलं 'डिअर जिंदगी'चं कौतुक

27नोव्हेंबर: 'डिअर जिंदगी' रिलीज झाला आणि सगळेच सिनेमाचं कौतुक करतायत. त्यात एक नाव आहे महेश भट्टचं. डिअर जिंदगीमध्ये आलिया भट्टचं काम पाहून आपण थक्कच झालो, असं महेश भट्टनी सांगितलं.

गौरी शिंदेचं दिग्दर्शन असलेला डिअर जिंदगी आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतो. महेश भट म्हणाले, 'सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतोय, ते मला ठाऊक नाही. पण मला सिनेमा खूपच आवडलाय. गौरी शिंदेला शाब्बासकी दिली पाहिजे.आणि शाहरूख खाननंची भूमिका तर लाजवाब.'

'डिअर जिंदगी आऊट ऑफ बॉक्स सिनेमा आहे. हा सिनेमा भारतीय सिनेमांसाठी नवं वळणं ठरेल.'महेश भट म्हणाले.

सिनेमा गौरी शिंदेनंच लिहिलाय. सिनेमात कुणाल रॉय कपूर, अली जफर आणि अंगद बेदी यांच्याही भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2016 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close