S M L

सांगलीत विद्रोही साहित्य संमेलन सुरू

8 मे सांगलीत विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ग्रंथ पालखीला सुरुवात झाली. क्रातींसिंहांची कन्या हौसाबाई पाटिल, जी. डी. बापू लाड यांनी या ग्रंथ पालखीची सुरुवात केली. महर्षी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला चालना देण्याची शपथ घेऊन, भारतीय संविधानाचे पुस्तक ठेवलेली ग्रंथपालखी सुरू झाली. विशेष म्हणजे या पालखीचे खांदेकरी होण्याचा मान महिलांना होता. विविध भागांतून आलेल्या लोकांनी आणलेल्या मशाली आणि समाजसुधारकांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवणारे चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. कष्टकरी, वेश्या, महिला, तृतीयपंथी असे समाजाच्या सर्व स्तरातील लोक या मिरवणुकीत सहभागी झाले. या पालखीआधी एका कष्टकरी महिलेच्या हस्ते संमेलनाच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. या संमेलनासाठी सरकारकडून कुठलाही निधी घेण्यात आलेला नाही. तर संमेलनासाठी प्रत्येक घरातून एक रुपया आणि एक मूठ धान्य गोळा करण्यात आले आहे. यातून अडीच लाख रुपये उभे करण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2010 12:24 PM IST

सांगलीत विद्रोही साहित्य संमेलन सुरू

8 मे

सांगलीत विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ग्रंथ पालखीला सुरुवात झाली.

क्रातींसिंहांची कन्या हौसाबाई पाटिल, जी. डी. बापू लाड यांनी या ग्रंथ पालखीची सुरुवात केली.

महर्षी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला चालना देण्याची शपथ घेऊन, भारतीय संविधानाचे पुस्तक ठेवलेली ग्रंथपालखी सुरू झाली.

विशेष म्हणजे या पालखीचे खांदेकरी होण्याचा मान महिलांना होता.

विविध भागांतून आलेल्या लोकांनी आणलेल्या मशाली आणि समाजसुधारकांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवणारे चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

कष्टकरी, वेश्या, महिला, तृतीयपंथी असे समाजाच्या सर्व स्तरातील लोक या मिरवणुकीत सहभागी झाले.

या पालखीआधी एका कष्टकरी महिलेच्या हस्ते संमेलनाच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.

या संमेलनासाठी सरकारकडून कुठलाही निधी घेण्यात आलेला नाही.

तर संमेलनासाठी प्रत्येक घरातून एक रुपया आणि एक मूठ धान्य गोळा करण्यात आले आहे. यातून अडीच लाख रुपये उभे करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2010 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close