S M L

यवतमाळमध्ये अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी

Sachin Salve | Updated On: Nov 27, 2016 06:38 PM IST

यवतमाळमध्ये अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी

28 नोव्हेंबर : आज संपूर्ण जिल्ह्यात शांततामय वातावरणात मतदान सुरू असताना यवतमाळ शहराच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही तणाव निर्माण झाला होता.

जिल्ह्यात आठ नगर पंचायत निवडणुकासाठी आज मतदान सुरू झालं. सगळीकडे मतदान शांततेत सुरू होतं. यवतमाळ शहरातील अंबिका नगर भागात नगर परिषेदची शाळा आहे. या शाळेत प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांचा मतदान सुरू असतांना दोन अपक्ष उमेदवाराच्या समर्थकात शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्या नंतर हा वाद एवढा विकोपाला केला की दोन्ही कडील समर्थकामध्ये जोरदार हाणामारी झालीय.

याच घटनेवरून महिला सुद्धा यात सहभागी झाल्या. महिलामध्ये सुद्धा हाणामारी झाली. हा सगळा प्रकार पोलिसांच्या डोळ्या देखत सुरू होता. काही महिला कार्यकर्त्यांची महिला पोलिसांसोबतही झटपट झाली. यानंतर दोन्ही कडील समर्थक पोलिसात तक्रार देण्यासाठी वडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेले.मात्र, थोड्यावेळानंतर दोन्ही कडील कार्यकर्त्यांनी तक्रार मागे घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2016 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close