S M L

कपाशीच्या भावात घसरण

प्रशांत बाग, जळगाव8 मे केंद्र सरकारने कापूस निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कपाशीच्या भावात जोरदार घसरण सुरू झाली आहे. प्रति क्विंटल 700 ते 800 रुपये भाव घसरल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. निर्यात पुन्हा सुरु करावी या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे.उत्तर महाराष्ट्रात कपाशीचे सगळ्यात जास्त उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते. सरकारच्या या कापूस निर्यात बंदी निर्णयाचा अत्यंत जोरदार फटका या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. दुबार वेचणीचा कापूस शेतकरी घरात साठवून ठेवतो.आणि अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात विकतो. कारण त्याला एक च आशा असते, ती चांगला भाव मिळण्याची.आता सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी एकत्र होत आहेत. निर्यात पुन्हा सुरू करा या मागणीसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर आली आहे. दक्षिणेकडील व्यापार्‍यांच्या फायद्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे. शेतकर्‍यासोबतच अनेक कापूस व्यापार्‍यांनाही या निर्यात बंदीने जेरीस आणले आहे. कारण चांगला भाव मिळावा म्हणून या व्यापार्‍यांच्या जिनिंग मिलमध्ये असलेल्या या साठ्याचे काय करायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.केंद्र सरकारने निर्यात पुन्हा सुरु केली नाही. तर शेतकरी रस्त्यावर उतरणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2010 12:37 PM IST

कपाशीच्या भावात घसरण

प्रशांत बाग, जळगाव

8 मे

केंद्र सरकारने कापूस निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कपाशीच्या भावात जोरदार घसरण सुरू झाली आहे. प्रति क्विंटल 700 ते 800 रुपये भाव घसरल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. निर्यात पुन्हा सुरु करावी या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे.

उत्तर महाराष्ट्रात कपाशीचे सगळ्यात जास्त उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते. सरकारच्या या कापूस निर्यात बंदी निर्णयाचा अत्यंत जोरदार फटका या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. दुबार वेचणीचा कापूस शेतकरी घरात साठवून ठेवतो.आणि अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात विकतो. कारण त्याला एक च आशा असते, ती चांगला भाव मिळण्याची.

आता सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी एकत्र होत आहेत. निर्यात पुन्हा सुरू करा या मागणीसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर आली आहे. दक्षिणेकडील व्यापार्‍यांच्या फायद्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे.

शेतकर्‍यासोबतच अनेक कापूस व्यापार्‍यांनाही या निर्यात बंदीने जेरीस आणले आहे. कारण चांगला भाव मिळावा म्हणून या व्यापार्‍यांच्या जिनिंग मिलमध्ये असलेल्या या साठ्याचे काय करायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

केंद्र सरकारने निर्यात पुन्हा सुरु केली नाही. तर शेतकरी रस्त्यावर उतरणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2010 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close