S M L

रोह्यात काकाची सरशी, पुतण्या संदीप तटकरे पराभूत

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2016 03:14 PM IST

रोह्यात काकाची सरशी, पुतण्या संदीप तटकरे पराभूत

28 नोव्हेंबर : काकाविरोधात दंड थोपटणाऱ्या पुतण्याला जनतेनं चांगलाच दणका दिलाय. रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपला गड कायम राखत पुतण्या आणि शिवसेनेचे उमदेवार संदीप तटकरेंना पराभूत करत सरशी केलीये.

काका -पुतण्यातील वाद महाराष्ट्राला नवा नाही. पण आज काका हा काकाच असतो हे पुन्हा एकदा एका काकांनी दाखवून दिलंय. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे यांचे भाऊ संदीप तटकरे यांना नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती परंतु, ती नाकारल्याने संदीप तटकरे यांनी थेट शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज भरला.

पण, मतदारराजाने काकांच्या पाठिशी राहत पुतण्याला धडा शिकवलाय. रोह्यात राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष पोटफोडे विजयी झाले. त्यांना 4354 मत मिळाली. अवघ्या सहा मतांनी संतोष पोटफोडे विजयी झाले. अपक्ष उमेदवार समीर शेडगे यांना 4348 मत मिळाली. तर संदीप तटकरे यांना 2532 मत मिळाली. संदीप तटकरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2016 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close