S M L

शालेय विद्यार्थ्यांनी केले मित्राचे शीर धडावेगळे

8 मेअद्वैत मेहता, पुणेपुण्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राचे शीर धडावेगळे केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका 18 वर्षाच्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. आणखी दोन फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. खून झाल्यानंतर धडावेगळे करून नदीत फेकलेल्या शीराचाही पोलीस शोध घेत आहेत.अभिषेक घोरपडे असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो आठवीत शिकत होता. त्याचा मृतदेह बुधवारी नाईक बेटावर झाडाला लटकवलेल्या स्थितीत आढळला. शीर गायब असल्याने सुरूवातीला मृतदेहाची ओळख पटली नाही. दरम्यान 6 तारखेला अभिषेक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. 7 तारखेला अभिषेकच्या नातेवाईकांनी मृतदेह आणि कपड्यांवरून अभिषेकला ओळखले. चौकशीत अभिषेक मित्रांसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गेल्याचे समजले. तपासात त्याच्याच शाळेतील सुनील मापारी या विद्यार्थ्याने त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. शाळेत गेल्या वर्षी दोन गटात भांडणे झाली होती. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे पुढे आले आहे.वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने फसवून अभिषेकला निर्जन अशा नाईक बेटावर नेण्यात आल्याचेही समजते.मंगळवार पेठेत झोपडपट्टीत राहणारा अभिषेक हा घोरपडे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. गृहिणी असलेल्या आईचे अश्रू थांबायला तयार नाहीत. तर टेम्पोचालक असलेल्या अभिषेकच्या वडिलांचा घडल्या प्रकारावर विश्वासच बसत नाही.विशेष म्हणजे या प्रकरणात सामील सर्व मुले अल्पवयीन आहेत. एकीकडे फरारी आरोपींचा तपास सुरू आहे. तर दुसरीकडे अभिषेकच्या नदीत फेकलेल्या शिराचाही शोध सुरू आहे. पुणे गेल्या काही दिवसापासून कसे असुरक्षित आहे, हे आपल्याला मागच्या महिन्याभरापासून चाललेल्या घटनांवरून लक्षात येते. बलात्काराच्या घटनांनंतर गेल्या काही दिवसांत पुण्यात घडलेल्या काही घटनांवर नजर टाकूया... गुरुवारी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात भर दुपारी दांगट हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन गटात चकमक झाली. त्यात शेख गटाच्या राहुल नायरची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले. आज दुपारी पिंपरी-चिंचवडला एका ज्वेलर्सला पिस्तुलाचा धाक दाखवून क्लोरोफॉर्मने बेशुध्द पाडुन अर्धा किलो सोने लुटले गेल्या रविवारी ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून 86 लाखांचे सोने लुटण्यात आले होते.आणि आज शाळेतील विद्यार्थ्यांनीच आपल्या मित्राचे शीर धडावेगळे केल्याची घटना घडली. या प्रकरणी एका 18 वर्षाच्या तरूणाला पोलीसांनी अटक केली. आणखी 2 फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2010 01:46 PM IST

शालेय विद्यार्थ्यांनी केले मित्राचे शीर धडावेगळे

8 मे

अद्वैत मेहता, पुणे

पुण्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राचे शीर धडावेगळे केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी एका 18 वर्षाच्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. आणखी दोन फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. खून झाल्यानंतर धडावेगळे करून नदीत फेकलेल्या शीराचाही पोलीस शोध घेत आहेत.

अभिषेक घोरपडे असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो आठवीत शिकत होता. त्याचा मृतदेह बुधवारी नाईक बेटावर झाडाला लटकवलेल्या स्थितीत आढळला.

शीर गायब असल्याने सुरूवातीला मृतदेहाची ओळख पटली नाही. दरम्यान 6 तारखेला अभिषेक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. 7 तारखेला अभिषेकच्या नातेवाईकांनी मृतदेह आणि कपड्यांवरून अभिषेकला ओळखले.

चौकशीत अभिषेक मित्रांसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गेल्याचे समजले. तपासात त्याच्याच शाळेतील सुनील मापारी या विद्यार्थ्याने त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. शाळेत गेल्या वर्षी दोन गटात भांडणे झाली होती. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे पुढे आले आहे.

वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने फसवून अभिषेकला निर्जन अशा नाईक बेटावर नेण्यात आल्याचेही समजते.

मंगळवार पेठेत झोपडपट्टीत राहणारा अभिषेक हा घोरपडे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. गृहिणी असलेल्या आईचे अश्रू थांबायला तयार नाहीत. तर टेम्पोचालक असलेल्या अभिषेकच्या वडिलांचा घडल्या प्रकारावर विश्वासच बसत नाही.

विशेष म्हणजे या प्रकरणात सामील सर्व मुले अल्पवयीन आहेत. एकीकडे फरारी आरोपींचा तपास सुरू आहे. तर दुसरीकडे अभिषेकच्या नदीत फेकलेल्या शिराचाही शोध सुरू आहे.

पुणे गेल्या काही दिवसापासून कसे असुरक्षित आहे, हे आपल्याला मागच्या महिन्याभरापासून चाललेल्या घटनांवरून लक्षात येते. बलात्काराच्या घटनांनंतर गेल्या काही दिवसांत पुण्यात घडलेल्या काही घटनांवर नजर टाकूया...

गुरुवारी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात भर दुपारी दांगट हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन गटात चकमक झाली. त्यात शेख गटाच्या राहुल नायरची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले.

आज दुपारी पिंपरी-चिंचवडला एका ज्वेलर्सला पिस्तुलाचा धाक दाखवून क्लोरोफॉर्मने बेशुध्द पाडुन अर्धा किलो सोने लुटले

गेल्या रविवारी ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून 86 लाखांचे सोने लुटण्यात आले होते.

आणि आज शाळेतील विद्यार्थ्यांनीच आपल्या मित्राचे शीर धडावेगळे केल्याची घटना घडली. या प्रकरणी एका 18 वर्षाच्या तरूणाला पोलीसांनी अटक केली. आणखी 2 फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2010 01:46 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close