S M L

मुख्यमंत्र्यांच्या 'होममिनिस्टर' बिग बींसोबत 'फिर से' !

Sachin Salve | Updated On: Nov 30, 2016 02:48 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'होममिनिस्टर' बिग बींसोबत 'फिर से' !

30 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जनमत चाचणीत मिळवलेल्या यशावर चर्चा होत असतानाच आज सोशल मीडियावर चर्चा आहे ती मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांची. कारण 'मुंबई मिरर' ह्या दैनिकानं मिसेस सीएमचा फोटो छापलाय तोही रेड वन पीसमध्ये. यात अमृता फडणवीस सुंदर तर दिसतायतच पण सोबत अमिताभ बच्चन असल्यामुळे त्यांचं दिसणं आणखी उठावदार झालंय.

हा फोटो एका गाण्याचा भाग आहे. त्या गाण्याचं टायटल आहे 'फिर से'. अहमद खान ते शूट करतायत. अमृता फडणवीस यांच्या जोडीला सोबत आहेत ते बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चन. दक्षिण मुंबईतल्या ओपेरा हाऊसमध्ये ह्या गाण्याचं शुटिंग पार पडलंय. सकाळी 9 वाजता सुरू झालेली शुटिंग रात्री उशिरापर्यंत चालू राहिलं.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अमृता फडणवीस यांच्या बॉलीवूड करिअरनेही जोर पकडलाय. 'जय गंगाजल' तसंच 'फिर से' मध्ये अमृतांनी दोन गाणेही गायलेत. आता तर त्या बीग बीसोबत स्क्रिन शेअर करतायत. मुख्यमंत्र्यांची पत्नी किंवा राजकीय नेत्यांची पत्नी म्हटलं की, तिनं फक्त घर सांभाळायचं, पोकळ घरंदाजपणा जपायचा असा पायंडा होता तो मोडून स्वत:च्या वेगळ्या वाटा शोधणा•या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं अभिनंदनच करायला हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 30, 2016 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close