S M L

अनधिकृत धंद्यांचं 'उपवन', लाॅजच्या तळघरात तब्बल 290 खोल्या

Samruddha Bhambure | Updated On: Dec 1, 2016 08:38 PM IST

अनधिकृत धंद्यांचं 'उपवन', लाॅजच्या तळघरात तब्बल 290 खोल्या

01  डिसेंबर : ठाण्यातल्या उपवन परिसरातील सत्यम लॉजच्या इमारतीखाली तब्बल 3 मजल्यांचं तळघर आढळलं आहेत. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान हे तळघर उघडकीस आलंय.

ठाणे शहरात पालिकेने रस्ता रूंदीकरण मोहीम हातात घेतली आहे. यासाठी शहरातले अनधिकृत बार, लाऊंजवर कारवाई सुरू केली आहे. याच कारवाई दरम्यान, उपवन परिसरातील सत्यम लॉजच्या तळघरात एक दोन नव्हे तब्बल 290 खोल्या असल्याचं आढळून आलं आहे.

उपवन भागातील या लॉजच्या समोरील बांधकाम बेकायदा होतं. हे बांधकाम लॉजवाल्यांनी स्वतःच तोडलं. पण पाण्याची एकपाईपलाईन जमिनीखाली गेली होती. ही इमारत ज्यावेळी पाडण्यासाठी जेव्हा महापालिकेचं पथक आलं त्यावेळी या पाईपलाईनचा शोध घेण्यात आला तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, या तळघरात अनैतिक कामं होत असल्याचा संशय आहे. धक्कादायकबाब म्हणजे तळघरात झालेल्या 290 खोल्याचं बांधकाम महापालिका आणि पोलिसांना कसं माहित नव्हतं. या खोल्यांमध्ये काय होत होतं याची पोलिसांनी कशी माहिती नाही असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2016 08:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close