S M L

किरीट सोमय्यांच्या शारीरिक व्यंगावर टिप्पणी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 1, 2016 09:43 PM IST

किरीट सोमय्यांच्या शारीरिक व्यंगावर टिप्पणी

01  डिसेंबर : महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय गोंधळही वाढत चालला आहे. एकीकडे भाजपचे खासदार किरीट सोमय्या वारंवार शिवसेनेला महापालिकेच्या कारभारावरून लक्ष्य करत असतानाच सोमय्या यांच्या तोतरेपणाच्या व्यंगावर अज्ञातांनी निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावर लावण्याची घोषणा करणारे भाजपचे खासदार किरीट सौमय्या यांची खील्ली उडवणारे पोस्टर्स, भाजप प्रदेश कार्यालयासमोर लावण्यात आलीत. या पोस्टर्सवर करीट सौमय्या यांच्या बोलण्याच्या लकबीची खिल्ली उडवणारी वाक्य लिहीण्यात आलीत.हे पोस्टर कुणी लावला याबाबत माहिती नसल्याचे प्रदेश कार्यालयातील कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षात सुरू झालेलं पोस्टर वॉर आता अधिकच रंगू लागल्याचं दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2016 07:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close