S M L

चिल्लर लोकच चिल्लरपणा करणार - आशिष शेलार

Samruddha Bhambure | Updated On: Dec 2, 2016 02:13 PM IST

ashish shelar

02  डिसेंबर : भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात काही अज्ञातांनी केलेल्या खोडसाळ पोस्टरबाजीवरुन भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी निशाना साधला आहे. "चिल्लर लोकच चिल्लरपणा करणार", असा टोला शेलार यांनी आज लगावला आहे.

दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या नगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवून भाजप नंबर एकचा पक्ष ठरला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपाने स्वबळावर लढायला हवी. शिवसेनेशी युती करण्याची काही गरज नसल्याचे वक्तव्य किरीय सोमय्या यांनी केलं होतं.

 सोमय्यांच्या या वक्तव्याने राजकीय पक्षात प्रचंड खळबळ माजली होती. सोमय्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून काही अज्ञातांनी गुरूवारी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवणारी पोस्टरबाजी केली होती. शिवसेनेने भाजपच्या मुख्यालयाबाहेरही हे पोस्टर लावले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार यांनी हा टोला हाणला  आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2016 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close