S M L

मोदी देणार 15 तारखेला उत्तर

10 मेआयपीएलमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी बीसीसीआयने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीशीला आता ललित मोदी 15 मे रोजी उत्तर देण्याची शक्यता आहे. ललित मोदी या नोटिशीला आज उत्तर देणार होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी आज बीसीसीआयकडे वेळ मागून घेतली. आणि बीसीसीआयही ललित मोदींची ही विनंती मान्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही विनंती मान्य झाल्यास त्यांना 5 दिवसांची मुदतवाढ मिळू शकते. त्यामुळे मोदी आता 15 मे रोजी बीसीसीआयच्या अधिकार्‍यांसमोर हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मोदी बीसीसीआयकडे काही कागदपत्रे मागणार असल्याचेही समजते. मागचे काही दिवस मोदी आपल्या वकिलांशी भेटून नोटीशीला काय उत्तर द्यायचे, यावर चर्चा करत होते. आणि मोदींनी एक हजार पानी अहवाल तयार केल्याचे बोलले जात आहे. आयपीएलच्या तिसर्‍या हंगामाच्या फायनल मॅचनंतर लगेचच बीसीसीआयने मोदींवर निलंबनाची कारवाई केली होती. आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार तसेच प्रक्षेपण आणि इंटरनेट हक्क विकताना काही जणांवर मेहरनजर केल्याचा आरोप मोदींवर आहे. तसेच बीसीसीआयची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्स टीममधल्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष आणि कोची टीमचे मालकी हक्क उघड करताना गोपनियता नियमांचे उल्लंघन हे आरोपही मोदींवर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 12:17 PM IST

मोदी देणार 15 तारखेला उत्तर

10 मे

आयपीएलमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी बीसीसीआयने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीशीला आता ललित मोदी 15 मे रोजी उत्तर देण्याची शक्यता आहे.

ललित मोदी या नोटिशीला आज उत्तर देणार होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी आज बीसीसीआयकडे वेळ मागून घेतली. आणि बीसीसीआयही ललित मोदींची ही विनंती मान्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही विनंती मान्य झाल्यास त्यांना 5 दिवसांची मुदतवाढ मिळू शकते. त्यामुळे मोदी आता 15 मे रोजी बीसीसीआयच्या अधिकार्‍यांसमोर हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मोदी बीसीसीआयकडे काही कागदपत्रे मागणार असल्याचेही समजते.

मागचे काही दिवस मोदी आपल्या वकिलांशी भेटून नोटीशीला काय उत्तर द्यायचे, यावर चर्चा करत होते. आणि मोदींनी एक हजार पानी अहवाल तयार केल्याचे बोलले जात आहे. आयपीएलच्या तिसर्‍या हंगामाच्या फायनल मॅचनंतर लगेचच बीसीसीआयने मोदींवर निलंबनाची कारवाई केली होती.

आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार तसेच प्रक्षेपण आणि इंटरनेट हक्क विकताना काही जणांवर मेहरनजर केल्याचा आरोप मोदींवर आहे. तसेच बीसीसीआयची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्स टीममधल्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष आणि कोची टीमचे मालकी हक्क उघड करताना गोपनियता नियमांचे उल्लंघन हे आरोपही मोदींवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close