S M L

बारामतीत 6 कोटी पकडले, रोकड बारामती बँकेची !

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2016 05:48 PM IST

बारामतीत 6 कोटी पकडले, रोकड बारामती बँकेची !

02 डिसेंबर : बारामतीत 6 कोटी 89 लाखाची रोकड पकडण्यात आलीय. भिगवण टोल नाक्यावर ही रोकड पकडली गेलीय. यात सर्व 500 आणि 1000 च्या नोटा आहेत. ही रक्कम बारामती सहकारी बँकेची असल्याची माहिती समोर आलीय.

बारामतीत आज निवडणूक निर्णय अधिक-यांच्या पथकाने भिगवण टोल नाक्यावर 6 कोटी 89 लाख रुपयांसह स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतलीये. सदरची रक्कम ही बारामती सहकारी बँकेची असून सोलापूर, बार्शी, करमाळा, टेंभुर्णीच्या शाखेची असून रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बारामती बँकेंने ही रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत भरणा करण्यासाठी आणली होती. या संदर्भात कुठल्या बँकेतून किती कॅश जमा झाली या बाबतचे सर्व डिटेल्स निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिले असल्याचे बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांनी सांगितलंय.

आता ही रक्कम बारामती ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून सदरची रक्कम ही पोत्यात भरलेल्या अवस्थेत आहे. ती मोजण्यात आली नसून इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी ही रक्कम तपासणी करूनच निर्णय देणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2016 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close