S M L

थायलंडचे नवे राजे महावजिरालोंगकोर्न

Samruddha Bhambure | Updated On: Dec 2, 2016 08:25 PM IST

थायलंडचे नवे राजे महावजिरालोंगकोर्न

02 डिसेंबर :   थायलंडचे युवराज महावजिरालोंगकोर्न हे थायलंडच्या राजगादीवर विराजमान झालेत. थायलंडचे राजे भूमिबोल अदुल्यादेज यांच्या निधनानंतर आता थायलंडच्या राजगादीची सूत्रं महावजिरालोंगकोर्न यांच्याकडे आलीयत. महावजिरालोंगकोर्न हे 64 वर्षांचे आहेत. थायलंडच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांनी त्यांच्याकडे राजगादीचा कार्यभार सोपवला. हा व्हिडिओ थायलंडच्या टीव्ही चॅनल्सवर दाखवण्यात आला.

महावजिरालोंगकोर्न हे राजे भूमिबोल यांचे एक पुत्र आहेत. राजे भूमिबोल यांचं 13 ऑक्टोबरला निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. जगामध्ये सर्वाधिक काळ राजगादीवर राहण्याचा मान त्यांना मिळाला. ते जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. आता त्यांच्यानंतर थायलंडची धुरा महावजिरालोंगकोर्न यांच्याकडे आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2016 08:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close