S M L

फिडेल कॅस्ट्रो यांना दिला जाणार अखेरचा निरोप

Samruddha Bhambure | Updated On: Dec 2, 2016 08:27 PM IST

फिडेल कॅस्ट्रो यांना दिला जाणार अखेरचा निरोप

fidel-castro-2-1480152108

02 डिसेंबर :  क्युबाचे लढवय्ये साम्यवादी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं गेल्या शनिवारी निधन झालं. फिडेल कॅस्ट्रो यांच्या सँतियागोजवळच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतायत. त्याआधी हवानाच्या क्रांती चौकात फिडेल कॅस्ट्रो यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक रॅली निघाली होती. क्युबाच्या राष्ट्रगीताने या रॅलीची सुरुवात झाली. फिडेल कॅस्ट्रो यांचे भाऊ आणि क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी त्यांना श्रद्धांजली वाहणारं भाषण केलं आणि या रॅलीची समाप्ती झाली.

फिडेल कॅस्ट्रो म्हणजे क्युबा हे समीकरण जगभरातल्या नागरिकांच्या मनात पक्कं आहे. क्युबामध्ये ठिकठिकाणी या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात येतेय. फिडेल कॅस्ट्रो यांचं पाथिर्व क्युबाची राजधानी हवानाहून 800 किमी अंतरावर असलेल्या सँतियागोमध्ये नेण्यात येतंय. तिथे त्यांच्या मूळ गावी त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल.

कॅस्ट्रो यांच्या निधनानंतर क्युबामध्ये 9 दिवसांचा दुखवटा पाळण्यात येतोय. क्युबामधल्या प्रत्येक नागरिकामध्ये फिडेल कॅस्ट्रोचा अंश आहे, असं क्युबाचे नागरिक मानतात. क्युबामध्ये मोफत शिक्षण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रातलं कॅस्ट्रो यांचं योगदान प्रत्येक जण बोलून दाखवतो.

आपल्या या महान नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हवानामधल्या रिव्होल्युशन प्लाझासमोर लोकांची रीघ लागलीय. क्युबाची राजधानी हवाना आणि सांतियागोजवळच्या फिडेल कॅस्ट्रो यांच्या मूळ गावी त्यांना लष्करी इतमामात सलामी देण्यात आली. सँतियागो दे क्युबामधल्या सँता इफिजेनियामध्ये कॅस्ट्रो यांच्यावर अंत्यसंस्कार होतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2016 08:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close