S M L

उद्धव ठाकरेंसमोर नोटाबंदीचं मनोहर जोशींकडून कौतुक

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2016 10:21 PM IST

उद्धव ठाकरेंसमोर नोटाबंदीचं मनोहर जोशींकडून कौतुक

03 डिसेंबर : नोटाबंदीच्या मोदींच्या निर्णयाला शिवसेनेचा तीव्र विरोध असताना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरेंच्या समोरच मोदींच्या निर्णयाचं कौतुक केलं. पंतप्रधान स्वत:हुन मैदानात उतरले आहे त्यांची योजना चांगली आहे आणि हे देशाच्या हितासाठी आहे अशी स्तुतीसुमनं मनोहर जोशी यांनी उधळली.

मनोहर जोशींच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आत्मचरीत्रांचं आज मुंबईत प्रकाशन झालं. यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंच्या समोरच मनोहर जोशींनी मोदींचं कौतुक केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.  मनोहर जोशींनी इतिहास घडवला असे गौरवउद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले तर आयुष्यातल्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाणारे मनोहर जोशी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.उद्धव ठाकरेंची भूमिका मनोहर जोशींना मान्य नाही का अशी चर्चा शिवसैनिकांत यानिमित्ताने सुरू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2016 10:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close