S M L

डॉक्टरांनी काढून टाकले महिलेचे गर्भाशय

10 मे सोलापुरातील सरकारी हॉस्पिटल आधीच वेगवेगळ्या गैरप्रकारांमुळे कुप्रसिद्ध झाले आहे. त्यात आज आणकी एका घटनेची भर पडली. डॉक्टरांनी एका महिलेचे गर्भाशयच काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार इथे उघडकीस आला. सोलापुरातील एका महिलेचे सीझेरियन करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या गर्भाशयाला मोठी जखम झाली. डॉक्टरांना रक्तस्त्राव थांबवता आला नाही, म्हणून डॉक्टरांनी या महिलेचे गर्भाशयच काढून टाकले. या महिलेचे हे पहिलेच बाळंतपण होते. गर्भाशय काढल्याने आता तिला भविष्यात बाळाला जन्म देता येणार नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच गर्भाशय काढावा लागल्याचा आरोप महिलेच्या आईनं केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 02:10 PM IST

डॉक्टरांनी काढून टाकले महिलेचे गर्भाशय

10 मे

सोलापुरातील सरकारी हॉस्पिटल आधीच वेगवेगळ्या गैरप्रकारांमुळे कुप्रसिद्ध झाले आहे. त्यात आज आणकी एका घटनेची भर पडली. डॉक्टरांनी एका महिलेचे गर्भाशयच काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार इथे उघडकीस आला.

सोलापुरातील एका महिलेचे सीझेरियन करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या गर्भाशयाला मोठी जखम झाली. डॉक्टरांना रक्तस्त्राव थांबवता आला नाही, म्हणून डॉक्टरांनी या महिलेचे गर्भाशयच काढून टाकले.

या महिलेचे हे पहिलेच बाळंतपण होते. गर्भाशय काढल्याने आता तिला भविष्यात बाळाला जन्म देता येणार नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच गर्भाशय काढावा लागल्याचा आरोप महिलेच्या आईनं केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close