S M L

300 कोटींचे धान उघड्यावर

गोपाल मोटघरे, गोंदिया 10 मेयंदा पाऊस कमी झाल्याने धानाची प्रत घटली आहे. राज्यात 20 टक्क्यांपर्यंतच तुकडा धान घेण्याचा नियम आहे. पण यंदा 20 टक्यांहूनही अधिक धान तुकडा झाला आहे. याच मुद्यावरच्या सरकार आणि राईस मिल मालकांच्या वादातून 300 कोटींचे धान उघड्यावर पडले आहे. आणि या वादात भरडला जातोय, तो सामान्य धान कामगार...यंदा मेचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही गोंदियातील राईस मिल बंद आहेत. धान खराब झाल्याने 20 टक्क्यांहून अधिक तुकडा म्हणजेच लेवी धानाला परवानगी द्यावी, अशी राईस मिल मालकांची मागणी आहे. ते धान घ्यायला तयार नाहीत. धानाचा तांदूळ करताना मोठ्या प्रमाणात त्याचा तुकडा पडतो. राज्यात एकूण तांदळाच्या 20 टक्केच तुकडा तांदूळ खरेदी केला जातो. इतर राज्यांत मात्र 20 टक्याहून अधिकचा तुकडा तांदूळ तेथील सरकार खरेदी करते. त्यामुळे महाराष्ट्रातही हा नियम लागू करावा, असे राईस मिल संघटनेची मागणी आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वर्षाला 5 हजार कोटींच्या वर तांदळाचा व्यापार होतो. इथे 650 च्या वर राईस मिल्स आहेत. आदिवासी विकास महामंडळाने साडेपाच लाख क्विंटल धान खरेदी केले. पण मिल बंद असल्याने 300 कोटींचे धान उघड्यावर पडल्याने खराब होत आहे. राईस मिल व्यवसायावर एक लाख लोकांचे घर चालते. पण ऐन हंगामात राईस मिल बंद आहेत. सरकार आणि राईस मिल संघटनेच्या वादात सामान्य कामगार नाहक भरडला जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 02:13 PM IST

300 कोटींचे धान उघड्यावर

गोपाल मोटघरे, गोंदिया

10 मे

यंदा पाऊस कमी झाल्याने धानाची प्रत घटली आहे. राज्यात 20 टक्क्यांपर्यंतच तुकडा धान घेण्याचा नियम आहे. पण यंदा 20 टक्यांहूनही अधिक धान तुकडा झाला आहे.

याच मुद्यावरच्या सरकार आणि राईस मिल मालकांच्या वादातून 300 कोटींचे धान उघड्यावर पडले आहे. आणि या वादात भरडला जातोय, तो सामान्य धान कामगार...

यंदा मेचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही गोंदियातील राईस मिल बंद आहेत. धान खराब झाल्याने 20 टक्क्यांहून अधिक तुकडा म्हणजेच लेवी धानाला परवानगी द्यावी, अशी राईस मिल मालकांची मागणी आहे. ते धान घ्यायला तयार नाहीत.

धानाचा तांदूळ करताना मोठ्या प्रमाणात त्याचा तुकडा पडतो. राज्यात एकूण तांदळाच्या 20 टक्केच तुकडा तांदूळ खरेदी केला जातो. इतर राज्यांत मात्र 20 टक्याहून अधिकचा तुकडा तांदूळ तेथील सरकार खरेदी करते. त्यामुळे महाराष्ट्रातही हा नियम लागू करावा, असे राईस मिल संघटनेची मागणी आहे.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वर्षाला 5 हजार कोटींच्या वर तांदळाचा व्यापार होतो. इथे 650 च्या वर राईस मिल्स आहेत. आदिवासी विकास महामंडळाने साडेपाच लाख क्विंटल धान खरेदी केले. पण मिल बंद असल्याने 300 कोटींचे धान उघड्यावर पडल्याने खराब होत आहे.

राईस मिल व्यवसायावर एक लाख लोकांचे घर चालते. पण ऐन हंगामात राईस मिल बंद आहेत. सरकार आणि राईस मिल संघटनेच्या वादात सामान्य कामगार नाहक भरडला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close