S M L

मुरलीधर बाबाच्या मठात 12 गुप्त खोल्या

Sachin Salve | Updated On: Dec 4, 2016 05:00 PM IST

मुरलीधर बाबाच्या मठात 12 गुप्त खोल्या

05 डिसेंबर : अमरावतीच्या येलकीपूर्णा येथील मुरलीधर बाबाच्या मठात 12 गुप्त खोल्या असल्याची धक्कादायक बाबसमोर आलीये. अंनिस आणि भुमाता ब्रिगेडच्या काही महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांची नजर चुकवत या मठात शिरकाव केला. त्यावेळी त्यांनी केलेल्या पाहणीत ही बाब समोर आलीय.

मुरलीदास बाबाच्या रासलीलांचा आयबीएन लोकमतने पर्दाफाश केल्यानंतर मयुरा देशमुख, राजिया सुलताना या महिला कार्यकर्त्यांनी या मठात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केलेल्या पाहणीत या मठात 12 गुप्त खोल्या असून प्रत्येक खोलीत एक स्वच्छतागृह आणि 2 दरवाजे असल्याचं उघड झालंय. या खोल्या नक्की कशासाठी वापरल्या जात होत्या त्याचा तपास करण्याची गरज असल्याने पोलिसांनी या बाबाविरोधात ताबडतोब गुन्हा दाखल करावा अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 4, 2016 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close