S M L

इटलीच्या पंतप्रधानांचा राजीनामा, सार्वमताचा निकाल विरोधात

Samruddha Bhambure | Updated On: Dec 5, 2016 04:53 PM IST

इटलीच्या पंतप्रधानांचा राजीनामा, सार्वमताचा निकाल विरोधात

05 डिसेंबर :  इटलीचे पंतप्रधान मॅट्टिओ रेन्झी यांनी अखेर राजीनामा दिलाय. घटनादुरुस्तीसाठी घेतलेल्या सार्वमतात पराभव झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. सार्वमताचा जो निकाल आलाय तो मला मान्य आहे, असं म्हणत त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. इटलीनध्ये घटनादुरुस्तीवरून हे सार्वमत घेण्यात आलं. यात 60 टक्के लोकांनी नाही असं मत दिलं आणि 40 टक्के लोकांनी हो असं मत दिलं. त्यामुळे मॅट्टिओ रेन्झी यांचा पराभव झाला.

इटलीमधल्या केंद्र सरकारला जास्त अधिकार देण्यासाठी रेन्झी यांनी घटनादुरुस्तीचा प्रयत्न केला. पण या घटनादुरुस्तीमुळे सिनेटचे अधिकार कमी होतील आणि सगळी सत्ता पंतप्रधानांकडे केंदि्रत होईल,असा विरोधकांचा आरोप होता. मॅट्टिओ रेन्झी यांच्या पक्षातल्या नेत्यांनीही त्यांना विरोध केला होता. आणि याच मतावर इटलीतली जनताही ठाम राहिली.

इटलीमधलं हे सार्वमत घटनादुरुस्तीसाठी असलं तरी की पंतप्रधानांचं राजकीय भवितव्यही यावरच अवलंबून होतं. मॅट्टिओ रेन्झी यांची लोकप्रियता घटत चालली होती. इटलीमध्ये सध्या आफ्रिकेतून येणार्‍या स्थलांतरितांचा मोठा प्रश्न आहे. देशाची आथिर्क स्थितीही खालावलीय. हे मॅट्टिओ रेन्झी यांचं अपयश आहे, असाच या सार्वमताचा अर्थ होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2016 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close