S M L

बालभारतीच्या पुस्तकांसाठी कागद खरेदीत गौडबंगाल

Samruddha Bhambure | Updated On: Dec 5, 2016 08:25 PM IST

बालभारतीच्या पुस्तकांसाठी कागद खरेदीत गौडबंगाल

05 डिसेंबर : बालभारतीच्या पुस्तकांसाठी खरेदी केली जाणारी कागदाची खरेदी हायकोर्टानं थांबवली आहे. यामुळे 30 हजार मेट्रिक टन कागदाची खरेदी रखडलीय.

बालभारतीच्या पुस्तकांसाठी झाडांपासून तयार केला जाणारा 'व्हर्जिन पल्प' प्रकारचा कागद का वापरतात, असा प्रश्नही कोर्टानं उपस्थित केलाय. रिसायकल केला जाणारा कागद स्वस्त आणि योग्य प्रतीचा असून त्याचा वापर का केला जात नाही? असंही कोर्टाने विचारलंय. याबद्दल 15 डिसेंबरपर्यंत खुलासा करा, असे आदेश कोर्टानं दिलेत.

बालभारतीसाठीच्या या कागद खरेदीत ठेकेदार आणि अधिकारी यांचं संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरवर्षी पहिली ते दहावीत शिकणार्‍या 20 कोटी विद्यार्थ्यांना बालभारतीची पुस्तकं दिली जातात. विशेष म्हणजे सरकार यातल्या 16 कोटी पुस्तकांचं विनामूल्य वितरण करतं. यासाठी सरकारकडून बालभारतीला पैसे मिळतात. पण बाजारात चांगल्या दर्जाचा रिसायकल कागद उपलब्ध असूनही अनेक वर्षांपासून 2 हजार किलोमीटर अंतरावरच्या कंपन्यांकडून हा कागद खरेदी केला जातो.

खरं तर झाडांपासून तयार केलेल्या व्हर्जिन पल्प पेपरमुळे पर्यावरणाची हानी होते. पण गुणवत्ता आणि वॉटरमार्कच्या नावाखाली या व्यवहारात मोठं आर्थिक गौडबंगाल असल्याचं दिसून येतंय. या प्रकरणी हायकोर्टाने 15 डिसेंबरपर्यंत खुलासा करण्याचे आदेश दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2016 07:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close