S M L

महामानवाला अभिवादन,चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

Samruddha Bhambure | Updated On: Dec 6, 2016 10:21 AM IST

महामानवाला अभिवादन,चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

06 डिसेंबर: आज 60वा महापरिनिर्वाण दिन. महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून जनसागर दादरच्या चैत्यभूमीवर लोटलाय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर लोटलाय.

या जनसागरात सगळ्या वयोगटातली माणसं आली आहेत. देशभरातून आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांतून भीमगर्जना करत जनसमूदाय इथे आलाय. यात तरुणांची संख्या जास्त आहे. 'शिका आणि संघटित व्हा' हा बाबासाहेबांचा मंत्र ही तरुण पिढी आत्मसात करतेय.

चैत्यभूमीवर आंबेडकरी साहित्याचे अनेक स्टॉल्स पाहायला मिळतायत. आंबेडकरांची पुस्तकं, दिनदर्शिका, बिल्ले याशिवाय गौतम बुद्धांचे फोटो, पुतळेही ठिकठिकाणी आहेत. वेगवेगळ्या संस्थांनी इथे वैद्यकीय शिबिरं, जेवणाची व्यवस्था यांचंही आयोजन केलंय.

याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमांजली या विशेष कार्यक्रमाचं आयोजन वडाळ्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आलंय. प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, प्रसिद्ध पखवाज वादक भवानी शंकर ,उस्ताद दिलशाह खान, पंडित मुकेश जाधव, पंडित विश्वमोहन भट, यांसारख्या जागतिक कीर्तीचे कलावंत सूर-ताल-बंदिशीनं बाबासाहेबांना आदरांजली वाहतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2016 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close