S M L

सेना, मनसे युतीची नांदी

11 मेएकमेकांच्या विरोधात डरकाळ्या फोडणारी शिवसेना आणि मनसे भविष्यात एकत्र येईल, यावर विश्वास ठेवायला अजूनही कुणी तयार नाही. पण अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही सेना एकत्र आल्याचे 'अविश्वसनीय' चित्र पाहायला मिळाले आहे. या निवडणुकीसाठी मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला. अंबरनाथच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण मनसे आणि अपक्ष कुणाला साथ देणार यावरच निकाल अवलंबून होता. मनसे शिवसेनेसोबत जाणार नाही, अशी चर्चा सोमवारी दिवसभर होती. पण मनसे आणि शिवसेना युती झाली आणि सुनील चौधरी नगराध्यक्ष झाले. मनसेच्या समर्थनामुळे सलग चौथ्यांदा अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता आली आहे. नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार्‍या मनसे आणि शिवसेनची युती म्हणजे नव्या राजकीय समिकरणांची सुरुवात आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मनसेने पाठिंबा का दिला?या पाठिंब्याद्वारे आपल्याला कुणीही गृहित धरु नये, असा इशारा मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिला आहे.मनसेच्या 4 आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत गेली दोन अधिवेशने सरकार चाल-ढकल करत आहे. त्यामुळे यातून सरकारला इशारा देण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.जूनला होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत विधानसभेतील राजकीय बलाबल पाहिले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी पाच उमेदवार सहज निवडून आणू शकते. पण आघाडीला सहावा आणि युतीला पाचवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर मनसेच्या मदतीची गरज आहे.त्यामुळे शिवसेना आमच्यासाठी अस्पृश्य नाही हे अंबरनाथमधून दाखवून देत मनसेने राजकीय खेळी खेळत आघाडीला इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2010 01:47 PM IST

सेना, मनसे युतीची नांदी

11 मे

एकमेकांच्या विरोधात डरकाळ्या फोडणारी शिवसेना आणि मनसे भविष्यात एकत्र येईल, यावर विश्वास ठेवायला अजूनही कुणी तयार नाही.

पण अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही सेना एकत्र आल्याचे 'अविश्वसनीय' चित्र पाहायला मिळाले आहे.

या निवडणुकीसाठी मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला. अंबरनाथच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण मनसे आणि अपक्ष कुणाला साथ देणार यावरच निकाल अवलंबून होता.

मनसे शिवसेनेसोबत जाणार नाही, अशी चर्चा सोमवारी दिवसभर होती. पण मनसे आणि शिवसेना युती झाली आणि सुनील चौधरी नगराध्यक्ष झाले.

मनसेच्या समर्थनामुळे सलग चौथ्यांदा अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता आली आहे. नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार्‍या मनसे आणि शिवसेनची युती म्हणजे नव्या राजकीय समिकरणांची सुरुवात आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मनसेने पाठिंबा का दिला?

या पाठिंब्याद्वारे आपल्याला कुणीही गृहित धरु नये, असा इशारा मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिला आहे.

मनसेच्या 4 आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत गेली दोन अधिवेशने सरकार चाल-ढकल करत आहे. त्यामुळे यातून सरकारला इशारा देण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.

जूनला होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत विधानसभेतील राजकीय बलाबल पाहिले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी पाच उमेदवार सहज निवडून आणू शकते. पण आघाडीला सहावा आणि युतीला पाचवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर मनसेच्या मदतीची गरज आहे.त्यामुळे शिवसेना आमच्यासाठी अस्पृश्य नाही हे अंबरनाथमधून दाखवून देत मनसेने राजकीय खेळी खेळत आघाडीला इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2010 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close