S M L

दिलीप कुमारांच्या पायाला सूज, लीलावतीत दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Dec 7, 2016 11:23 AM IST

dilipkumar

07 डिसेंबर - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना काल (बुधवारी) पुन्हा एकदा लिलावाती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उजव्या पायांची सूज आणि दुखण्याच्या तक्रारीनंतर काल त्यांना लिलावतीत आणण्यात आलं.

दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांनी ही माहिती दिली आहे. डॉक्टरांचं एक विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे, 11 डिसेंबरला म्हणजेच दिलीप कुमार 94 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. पण त्याआधीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

'नियमित वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात न्यायचंच होत. मात्र त्याअगोदरच पायांची सूज आणि दुखण्याच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल केलं. मात्र वाढदिवसाआधी आपण त्यांना घरी नेऊ', असं सायरा बानू यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2016 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close