S M L

विराट कोहलीचं 'ते' ट्विट 'गोल्डन'

Samruddha Bhambure | Updated On: Dec 7, 2016 08:18 PM IST

विराट कोहलीचं 'ते' ट्विट 'गोल्डन'

07 डिसेंबर : विराट कोहलीनं काही महिन्यापूर्वी अनुष्का शर्मावर होणाऱ्या टीकेला ट्विटरनं उत्तर दिलं होतं. आणि विराटचं ते बहुचर्चित ट्विट गोल्डन ट्विट म्हणून घोषित झालंय.

विराट कोहलीच्या खडतर काळात जेव्हा त्याची बॅट थंड होती,त्याला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं.लोकांनी टी-20 वर्ल्डकपमधील त्याच्या सुमार कामगिरीला गर्ल्डफ्रेंड अनुष्का शर्माला कारणीभूत ठरवलं.सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं.तिच्यावर अनेक जोक्स आणि कमेंट्स  करण्यात आल्या.

तेव्हा त्यांनी आपल्या नात्याची खुली कबुली दिली नव्हती.तरीही लोकांचं हे वागणं त्याला आवडलं नाही.विराटने त्याबद्दल नाराजी व्यक्त करून एक ट्विट केलं.

ते ट्विट असं होतं,'अनुष्काला ट्रोल करणाऱ्या लोकांना स्वत:ची लाज वाटायला हवी.तिने मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा दिली आहे.'

या ट्विटला युजर्सचा मोठा पाठिंबा मिळाला. त्याचं हे ट्विट 39,000 लोकांनी रिट्विट केलं.लाखभर लोकांनी लाईक केलं आणि आता त्याच ट्विटला 'ट्विट ऑफ द इयर' म्हटलं गेलंय.

दरवर्षी ट्विटर आपला रिपोर्ट सादर करतं.त्यात मोस्ट रिट्विटेड ट्विट,लोकप्रिय हॅशटॅग,मोस्ट फॉलोड अकाउंटस् आणि मोस्ट ट्रेडिंग गोष्टींचा खुलासा केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2016 07:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close