S M L

पोलिसांना घर कधी?

12 मेनेत्यांच्या घरांसाठी दोन दिवसांत परवानगी मिळते. पण पोलिसांना मात्र तीन वर्षे झाली तरी हक्काचे घर मिळालेले नाही. नेत्यांसाठी म्हाडाने आलिशान घरेही उपलब्ध करून दिली. पण पण मुंबई पोलिसांसाठी 2005मध्ये जाहीर झालेली योजना अजूनही कागदावरच आहे. 2005मध्ये मुंबईतील चुनाभट्टी भागात म्हाडाच्या योजनेखाली मुंबई पोलिसांना 550 घरे देण्याची योजना जाहीर झाली होती.त्यासाठी 2006 मध्ये अंदाजे 950 पोलिसांनी अर्ज केले. त्यापैकी 605 पोलिसांची निवडही करण्यात आली. कागदपत्रांसाठी पोलिसांना सर्क्युलरही काढण्यात आले. पण आजपर्यंत या योजनेची अमलबजावणी झालेली नाही. ही योजना अजूनही कागदावरच आहे. 2009 मध्ये याप्रकरणी मानव जोशी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र अजूनही ही योजना लाल फितीतच अडकून पडली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2010 01:18 PM IST

पोलिसांना घर कधी?

12 मे

नेत्यांच्या घरांसाठी दोन दिवसांत परवानगी मिळते. पण पोलिसांना मात्र तीन वर्षे झाली तरी हक्काचे घर मिळालेले नाही.

नेत्यांसाठी म्हाडाने आलिशान घरेही उपलब्ध करून दिली. पण पण मुंबई पोलिसांसाठी 2005मध्ये जाहीर झालेली योजना अजूनही कागदावरच आहे.

2005मध्ये मुंबईतील चुनाभट्टी भागात म्हाडाच्या योजनेखाली मुंबई पोलिसांना 550 घरे देण्याची योजना जाहीर झाली होती.

त्यासाठी 2006 मध्ये अंदाजे 950 पोलिसांनी अर्ज केले. त्यापैकी 605 पोलिसांची निवडही करण्यात आली. कागदपत्रांसाठी पोलिसांना सर्क्युलरही काढण्यात आले. पण आजपर्यंत या योजनेची अमलबजावणी झालेली नाही.

ही योजना अजूनही कागदावरच आहे. 2009 मध्ये याप्रकरणी मानव जोशी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र अजूनही ही योजना लाल फितीतच अडकून पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2010 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close