S M L

मेट्रोच्या भूमिपूजनाला उद्धव यांना बोलवा -सरनाईक

Sachin Salve | Updated On: Dec 8, 2016 11:42 PM IST

मेट्रोच्या भूमिपूजनाला उद्धव यांना बोलवा -सरनाईक

08 डिसेंबर : पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा वाद निर्माण झाला असताना आता या श्रेयाच्या लढाईत शिवसेनेनंही उडी घेतलीये. या भूमिपूजनाच्या सोहळ्याला स्टेजवर मोदींसोबत उद्धव ठाकरेंना निमंत्रित करावं अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलीये.

मुंबई मेट्रो-4च्या भूमिपूजनाचं श्रेय एकट्या भाजपानं घेऊ नये असा टोलाही सरनाईक यांनी लगावलाय. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात ठाणे कासारवडवली या मेट्रो-4च्या मार्गाचं भूमिपूजन होणार आहे. यावेळी भाजपनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही बोलवावं अशी मागणी शिवसेनेनं केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2016 11:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close