S M L

'वेस्टर्न लाईनच्या मुली सेंट्रल लाईनच्या मुलांना नाकारतात​?'

Samruddha Bhambure | Updated On: Dec 9, 2016 10:56 AM IST

mumbai_local3

09 डिसेंबर : मुलं मुली लग्नं करताना नेमकं काय पाहून लग्न करतात? अर्थातच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मुंबईतलं लग्नासाठी पसंत न करण्याच कारण ऐकलं तर थोडसं आश्चर्य वाटेल. वेस्टर्न लाईनने प्रवास करणाऱ्या मुली हल्ली सेंट्रल लाईनने प्रवास करणाऱ्या मुलांना पसंत करत नाहीत असं स्पष्ट निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवलं आहे.

मुंबई हायकोर्टातील कॉन्फरन्स हॉलमध्ये रेल्वे सुरक्षेबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत हायकोर्टाने पश्चिम रेल्वे विरुद्ध मध्य रेल्वे या वादावर आपले मत नोंदवताना हे भाष्य केले आहे.

मुंबईत नेहमीच पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यांची तुलना केली जाते.  मुंबईत राहणाऱ्यांमध्ये अशी चर्चा नेहमीच रंगत असते. सोईसुविधांबाबत सेंट्रल लाईनच्या तुलनेत वेस्टर्न लाईन नेहमीच सरस आहे. पण नकार देण्याच ठोस असं कारण आतापर्यंत कुणालाच सापडलेलं नाही.

वेस्टर्न लाईनवर लोकलच्या गाड्यांची संख्या जास्त आहे, त्या तुलनेत सेंट्रल रेल्वेवर कमी आहे. वेस्टर्नवर रहाणाऱ्या मुलींना वाटतं की तिकडं ठाणे, डोंबिवली, कल्याणला कसं रहायचं तर सेंट्रलवाल्यांना वाटतं की वेस्टर्नवर सगळी गर्दी असते मग तिथे नको राहायला. सेंट्रलची लाईन ही मराठमोळी मानली जाते तर वेस्टर्नवाले स्वतःला थोडेसे हाय क्लॅस मानतात. त्यामुळेच की काय मुंबईतली प्रतिष्ठा तुम्ही कुठल्या लाईनवर घर घेऊन रहाता आणि मग लग्न करता, यावरही ठरत असावी.

पण या सगळ्यात बिचारे हार्बरवाले, त्यांचा तर लग्नासाठी विचारच केला जात नसावा आणि चर्चाही नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2016 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close