S M L

मराठा आरक्षणावर चर्चेदरम्यान राम शिंदेंच्या डुलक्या

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2016 07:13 PM IST

मराठा आरक्षणावर चर्चेदरम्यान राम शिंदेंच्या डुलक्या

09 डिसेंबर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांना खडे बोल सुनावत होते तर दुसरीकडे त्यांच्याच पाठीमागे बसलेले कॅबिनेट मंत्री राम शिंदे चक्क डुलक्या मारत असल्याचं चित्र कॅमे-यात कैद झालंय.

हिवाळी अधिवेशनात देवेंद्र सरकारने मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची तयारी दाखवून विरोधकांचा विरोधक परतवून लावण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या विषयाचं राजकारण करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. आज विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. एक बोट आमच्याकडे दाखवत आहात पण तीन बोटं तुमच्याकडे आहेत असं सांगत मराठा आरक्षणाचं खापर मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर फोडलं. धनगर आरक्षणाबाबतही मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली.

पण हे सगळं होत असताना कॅबिनेट मंत्री राम शिंदे डुलक्या मारत होते. त्यांना झोप सहनच होत नव्हती. ते अधून मधून जागे होत होते. पण, पुन्हा झोपी जात होते. विशेष म्हणजे राम शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्याच पाठीमागे बसले होते. मुख्यमंत्री महत्त्वाच्या विषयावर विरोधकांवर हल्लाबोल करत होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील शिलेदार झोपा काढत असल्याचं चित्र सभागृहात पाहण्यास मिळालं. आपण मुख्यमंत्र्यांच्या मागे बसलोय आणि कॅमे-यात दिसू शकतो याचे सुद्धा भान राम शिंदेंना नव्हते. हे सरकार मुळात झोपलेलं आहे हे त्याचं जिवंत उदाहारण आहे असा टोला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी लगावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2016 06:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close